मुंबई: देशभरात पुन्हा एकदा करोना व्हायरसचं संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातही करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आलेत आणि यातून बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा सुटलेले नाहीत. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. रविवारी अभिनेता अक्षय कुमारची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर लगेचच त्याच्या आगमी चित्रपट ''च्या सेटवरही ४५ लोकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या चित्रपटासाठी काम करत असलेल्या ४५ ज्यूनिअर आर्टिस्टच्या करोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 'ई-टाइम्स'नं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या मढ आयलँड येथील 'राम सेतू'च्या सेटवर सोमवारी म्हणजेच ५ एप्रिलला १०० लोकांची एक टीम पोहोचणार होती. पण त्याआधी आणि निर्माता विक्रम मल्होत्रा यांनी सर्वांचीच करोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. ज्यात अक्षय कुमारसह १०० पैकी ४५ ज्यूनिअर आर्टिस्टच्या करोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. अक्षय कुमार आणि विक्रम मल्होत्रा यांच्या एका निर्णयामुळे अनेक लोक करोना होण्यापासून वाचले. FWICE जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांचं म्हणणं आहे की, 'चित्रपट 'राम सेतू'ची संपूर्ण टीम सुरुवातीपासूनत सर्व प्रकारची काळजी घेत आहे. पण वास्तवाच दुर्दैवानं आमच्या ज्यूनिअर आर्टिस्ट एसोसिएशनचे ४५ लोक पॉझिटिव्ह निघाले. या सर्वांवर सध्या उपचार सुरू असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.' 'राम सेतू'चं सोमवारी होणारं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे शूटिंग आता कमीत कमी १३-१४ दिवसांनंतर सुरू करण्यात येईल. चित्रपटाचा नायक अभिनेता अक्षय कुमार सुद्धा करोना पॉझिटिव्ह आहे. करोनाची लागण होण्याआधी अक्षय कुमार मढ आयलँड येथे शूटिंग करत होता. दरम्यान अक्षयनं त्याचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली. अक्षयनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'नुकतीच माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून मी स्वतःला घरीच क्वारंटाइन केलं आहे. मी स्वतःची सर्व काळजी घेत आहे आणि करोना संबंधिच्या नियमांचं पालन करत आहे. जे लोक मागच्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःची करोना चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. मी लवकरच परत येईन.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2RaU7Vb
No comments:
Post a Comment