Breaking

Monday, May 31, 2021

भारतात आढळलेल्या करोना व्हेरियंटचं नामकरण, WHO नं दिलं 'हे' नाव... https://ift.tt/3fRMKKE

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेनं () करोना विषाणूच्या सर्व व्हेरियंट / स्ट्रेनचं नामकरण करण्याचा निर्णय घेतलाय. कोणत्याही प्रकारच्या करोना विषाणूचं नाव संबंधित देशांशी जोडण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं हा विषाणूच्या प्रकारांना नावं दिली आहेत. यामध्ये, सर्वप्रथम भारतात आढळलेल्या B.1.617 या विषाणूच्या प्रकाराला '' () असं नाव देण्यात आलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं सोमवारी याची जाहीर घोषणा केली. करोनाचा हा व्हेरियंट आतापर्यंत ५३ देशांत आढळला आहे. तर आणखीन सात देशांत या व्हेरियंटची ओळख पटल्याचं म्हटलं जातंय. करोनाच्या B.1.617 हा प्रकाराला जागतिक पातळीवर 'भारतीय व्हेरियंट' म्हटलं गेल्यानंतर भारतानं १२ मे रोजी याला आक्षेप घेतला होता. विषाणूच्या कोणताही / व्हेरियंट कोणत्याही देशाच्या नावाने ओळखला जाऊ नये, असं खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. सर्वप्रथम भारतात आढळलेला 'डेल्टा व्हेरियंट' तीव्र संक्रामक असल्याचं समोर आलंय. या व्हेरियंटच्या संक्रामक क्षमतेबद्दल जगभरात शोध सुरू आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, 'डेल्टा व्हेरियंट'पूर्वी भारतात आढळलेल्या व्हेरियंटला 'कप्पा' (Kappa) असं म्हटलं जाईल. हा व्हेरियंट गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा भारतात आढळला होता. हा व्हेरियंटनंदेखील जगातील ५० हून अधिक देशांत हातपाय पसरले आहेत. या नव्या नामकरणामुळे करोना विषाणूच्या सध्याच्या वैज्ञानिक नावांत बदल होणार नाही. कारण ते वैज्ञानिक तथ्य आणि शोधावर आधारित आहेत. परंतु, कोणत्याही प्रकारच्या स्ट्रेनसाठी एखाद्या देशाला ठपका ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ नये यासाठी त्यांचं नामकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड १९ तांत्रिक प्रमुख डॉ. मारिया वान केरखोवे यांनी म्हटलंय. करोना विषाणूचं वैज्ञानिक नाव (SARS-CoV-2) आणि शोध अगोदर प्रमाणेच सुरू राहील.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fSMhrO

No comments:

Post a Comment