Breaking

Monday, May 31, 2021

सौदीत मशिदीच्या लाउडस्पीकरच्या आवाजावर निर्बंध; कट्टरतावादी खवळले ! https://ift.tt/3fDkkoT

रियाध: सौदी अरेबियात अजान दरम्यान लाउडस्पीकरचा आवाज कमी ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशाविरोधात मुस्लिम कट्टरतावादी भडकले आहे. तर, सामान्यजणांनी याचे स्वागत केले आहे. मागील आठवड्यात प्रशासनाने याबाबतचे आदेश काढले होते. या आदेशानुसार लाउडस्पीकरच्या आवाजावर बंधने घालण्यात आली आहेत. या आदेशानुसार, अजान सुरू करण्याचे संकेत दिल्यानंतर लाउडस्पीकरला बंद ठेवण्यास सांगितले आहे. संपूर्ण नमाजला लाउडस्पीकरवर ऐकवण्याची आवश्यकता नसल्याचे सौदी सरकारने आदेशात म्हटले आहे. या आदेशानंतर सौदी अरेबिया आणि मुस्लिम देशांमधील सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. मुस्लिम कट्टरतावाद्यांनी रेस्टोरंट्स आणि कॅफेमधील मोठ्या आवाजावरही बंदी घालावी यासाठी ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. वाचा: वाचा: सोशल मीडियावर सरकारच्या आदेशाचे पडसाद उमटताच सौदी अरेबिया सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सौदी अरेबियाच्या इस्लामिक कार्याबाबतचे मंत्री अब्दुललतीफ अल शेख यांनी म्हटले की, अनेक कुटुंबीयांनी नमाजावेळी लाउड स्पीकरच्या मोठ्या आवाजावेळी लहान मुलांची झोपमोड असल्याची तक्रार केली. ज्यांना नमाज अदा करायची आहे, त्यांनी इमाम यांच्या अजानच्या आवाहनाची प्रतिक्षा करण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या मुद्यावरून लोकांची दिशाभूल करून त्यांनी चिथावणी देणारे हे सौदी अरेबियाचे शत्रू आहेत, असेही त्यांनी म्हटले. वाचा: सौदी अरेबियाने घेतलेली ही नवी भूमिका प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सुधारणावादी धोरणाचा भाग असल्याची चर्चा आहे. मोहम्मद सलमान यांनी अनेक सामाजिक निर्बंध शिथिल केले आहेत. मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी करण्याच्या आदेशाचा सौदी अरेबियाच्या मशिदींवर किती परिणाम होतो, हे सांगता येणार नसल्याचे 'रॉयटर्स'ने म्हटले आहे. रियाधमधील काही मशिदींनी लाउडस्पीकरचा आवाज कमी केला असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fXzPHp

No comments:

Post a Comment