Breaking

Tuesday, August 31, 2021

कठोर निर्बंधांच्या भीतीने चाकरमानी दहा दिवस आधीच कोकणात https://ift.tt/2WG1o2d

म. टा. खास प्रतिनिधी, दहा दिवसांवर येऊन ठेपला, तरी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावलीबाबत अद्यापही काही स्पष्टता नाही. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या आठ-दहा दिवस आधीच चाकरमान्यांनी कोकणाची वाट धरली आहे. निर्बंध जाहीर होण्याआधीच आणि त्यांची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वीच अनेकांनी गाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विशेषकरून ज्यांना मोबाइल नेटवर्कची अडचण नाही आणि ज्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे, अशा चाकरमान्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. दर वर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरांतून लाखभर चाकरमानी कोकणात जातात. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अटी आणि निर्बंध लावण्यात येणार आहेत. लशींच्या दोन मात्रा घेतलेल्यांना थेट प्रवेश द्यावा का? लस न घेतलेल्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक ठेवावी का? एक डोस घेतलेल्यांची चेक पोस्टवर अँटिजेन चाचणी करावी का? याबाबत अद्यापही सरकारी पातळीवर एकमत झालेले नाही. त्यामुळे चाकरमान्यांच्या मनातही संभ्रम असून ऐनवेळी निर्बंध लादल्यास अडचण होईल, या भीतीने अनेकांनी आठ-दहा दिवस आधीच गावची वाट धरली आहे. लवकर गाव गाठणाऱ्या चाकरमान्यांमध्ये वर्क फ्रॉम होम करत असलेल्या चाकरमान्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कोकणात अनेक ठिकाणी मोबाइल नेटवर्कमध्ये अडचणी येतात. मात्र, शहरी भागात मोबाइलला नेटवर्क मिळत असल्याने अशा भागात राहणाऱ्यांनी गावी लवकर जाणे पसंत केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BtmcIT

No comments:

Post a Comment