: कोलकाता : आणि रोहित शर्मा हे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात फलंदाजी करत असताना एक भन्नाट किस्सा घडला. यावेळी विराटने एक अशी गोष्ट केली रोहित मैदानात हसतच राहीला. नेमकं घडलं तरी काय, पाहा भन्नाट व्हिडीओ... आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ही घटना घडली. विराट कोहलीने जोरदार फटका मारला, पण चेंडू नॉन स्ट्रायकरवर उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या अंगाला लागला आणि स्टम्पच्या दिशेने गेला. यावेळी मिडविकेटवर उभ्या असलेल्या पोलार्डने रोहितला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, पण रोहित क्रीजमध्ये उभा होता. यावेळी विराट कोहलीने पोलार्डला दिलेली प्रतिक्रिया स्टंप माईकवर रेकॉर्ड करण्यात आली. तो म्हणाला की, 'तू अशा प्रकारे रोहितला धावबाद करू शकत नाही, पॉली'. कोहलीच्या या प्रतिक्रियेवर रोहित शर्मालाही हसू आवरता आले नाही. विराट कोहलीचे व्यक्तिमत्वच असे आहे की, जेव्हा जेव्हा तो मैदानात दिसतो, तेव्हा नक्कीच काहीतरी हालचाल होत असल्याचे पाहायला मिळते. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्यावरील कॅमेऱ्याचा फोकस कमी झाला असला तरी क्षेत्ररक्षण असो किंवा फलंदाजी, त्याची धडाकेबाज उत्तरे स्टंप माइकवर रेकॉर्ड केली गेली आहेत आणि प्रेक्षकांनाही ती खूप आवडत आहेत. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पाहायला मिळाला. यावेळी कोहलीने रोहित शर्माला धावबाद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी संघाच्या कर्णधार कायरन पोलार्डची खिल्ली उडवली. या सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली. भारताने दोन गडी झटपट गमावल्यानंतर कोहलीने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने ४१ चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. दरम्यान, टीम इंडियाने शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या थरारक दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ८ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9ApFSwC
No comments:
Post a Comment