श्रीनगर: महाराष्ट्राचा वीरपुत्र यांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले आहे. कश्मीरमधील जिल्ह्यात ही चकमक झडली. यात हा आणखी एक जवान शहीद झाला आहे. रोमित आणि संतोष यादव हे दोघेही राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते. ( ) वाचा : काश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी या घटनेची माहिती दिली. शोपियाँ जिल्ह्यातील झेनपुरा येथील चेरमार्ग येथे दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोधमोहीम हाती घेतली होती. नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात असताना, गौहार अहमद भट याच्या घरासमोर जवान आले. त्यावेळी भटने जवानांची दिशाभूल करताना, घरामध्ये दहशतवादी नसल्याचे सांगितले. त्याची चौकशी सुरू असतानाच घरामध्ये लपलेल्या दहशतवाद्याने गोळीबाराला सुरुवात केली. यात दोन जवानांना गोळ्या लागल्या. अन्य जवानांनी केलेल्या कारवाईत हा दहशतवादी मारला गेला. असे मृत दहशतवाद्याचे नाव आहे. तो पुलवामातील लारू काकपुरा येथील रहिवासी होती. त्याच्या जवळून एक रायफल आणि पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. दार याला एप्रिल २०२०मध्ये चकमक झालेल्या एका घरातून अटक करण्यात आली होती आणि ऑगस्ट २०२१मध्ये मुक्त करण्यात आले होते. त्यानंतरही त्याच्या दहशतवादी कारवाया सुरूच होत्या. काही दिवसांपूर्वी तो घरातून पळून गेला होता. त्यानंतर तो लष्कर-ए-तोयबा मध्ये सक्रिय झाल्याचे समोर आले होते. वाचा : शिगाववर पसरली शोककळा रोमित तानाजी चव्हाण हे सांगलीतील वाळवा तालुक्यातील शिगावचे सुपुत्र होते. पाच वर्षांपूर्वी ते मुंबई येथे सैन्यदलात भरती झाले होते. त्यानंतर ते मध्य प्रदेशात गेले. तेथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटर येथे त्यांचे एक वर्षे प्रशिक्षण झाले. लष्कराच्या सेवेत रुजू झाल्यानंतर वर्षभरापूर्वीच जम्मू काश्मीर मध्ये १ राष्ट्रीय रायफल्स येथे त्यांना पोस्टिंग मिळाली होती. दहशतवाद्यांशी लढताना आज रोमित यांना वीरमरण आल्याने सांगलीवर शोककळा पसरली आहे. रोमित यांच्या निधनाची बातमी गावात धडकताच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रोमित यांचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यात काम करतात. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fijZtka
No comments:
Post a Comment