डोंबिवली : रशिया आणि युक्रेन या दोन देशांदरम्यान युध्द () सुरू झाल्यानंतर भारताची चिंता वाढली आहे. युक्रेनवर रशियाकडून हल्ले होत असून तेथे अनेक भारतीय अडकले आहेत. अशा अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याचे प्रयत्न भारत सरकारने सुरू केले आहेत. भारतीय नागरिकांप्रमाणेच अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून यामध्ये कल्याण-डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी मुरबाड, भिवंडी, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथील आहेत. (students from kalyan dombivli and stranded in ) ठाणे जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातर्फे युक्रेन येथे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी दिलेल्या हेल्पलाइनवर या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संपर्क साधला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी केले आहे. क्लिक करा आणि वाचा- युक्रेनमध्ये ठाणे जिल्ह्यातील ७ विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळत असून यांपैकी दोन विद्यार्थी ठाण्यातील, मुरबाड, भिवंडी, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवलीचा प्रत्येकी एक विद्यार्थी आहे. ठाणे जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी १) शुभम म्हाडसे - मुरबाड २) संतोष चव्हाण - भिवंडी ३) प्रथमा सावंत - नवी मुंबई ४) चैताली संझगिरी - ठाणे ५) लक्ष संझगिरी - ठाणे ६) हेमंत नेहरे - कल्याण ७) संकेत पाटील - डोंबिवली क्लिक करा आणि वाचा- ठाणे येथील मदत कक्ष जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे फोन नं. ०२२-२५३०१७४०/ २५३८१८८६ ई मेल - thaneddmo@gmail.com क्लिक करा आणि वाचा- नवी दिल्ली येथील मदत कक्ष केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797 दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905 फॅक्स 011-23088124 ई मेल situationroom@mea.gov.in
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kqPIcnl
No comments:
Post a Comment