Breaking

Thursday, February 24, 2022

बायडन यांची पुतीन यांना धमकी; 'तुम्ही युद्धाचा पर्याय निवडला, आता...' https://ift.tt/Oqrjhed

वॉशिंग्टन: आणि या दोन देशांत युद्ध भडकलं आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर युक्रेनमधील अनेक शहरांना युद्धभूमीचे स्वरूप आले आहे. तेथील भीषण दृष्ये समोर येत असून अवघ्या जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महासत्ता अमेरिकेने आपली भूमिका परत स्पष्ट केली आहे. राष्ट्राध्यक्ष यांनी देशाला संबोधित केले व थेट शब्दांत रशियाला इशारा दिला आहे. ( ) वाचा : रशिया युक्रेनवर हल्ला करणार ही भीती आम्ही व्यक्त केली होती आणि तसंच आता घडलं आहे. रशियाचा युक्रेनवरील हा हल्ला पूर्वनियोजित आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या हल्ल्याची व्यूहरचना आखली जात होती. युक्रेनचा यात काहीही दोष नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी ठरवून हा हल्ला घडवून आणला आहे. आम्ही रशियाच्या या कृतीचा निषेध करत आहोत, असे बायडन म्हणाले. पुतीन यांच्याकडे चर्चेचा पर्याय खुला होता मात्र त्यांनी युद्धाचा मार्ग अवलंबला आहे. याचे परिणाम त्यांना आणि त्यांच्या देशाला भोगावे लागतील. कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्यावर हल्ला करून तो देश काबीज करण्याची वृत्ती आम्ही मान्य करणार नाही. हे मनसुबे हाणून पाडण्यासाठी आम्ही रशियाविरुद्ध ठामपणे उभे राहू, असेही बायडन यांनी स्पष्ट केले. युक्रेनमध्ये आम्ही सैन्य पाठवणार नाही मात्र नाटो देशांच्या इंच इंच भूमीचे रक्षण करणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो, असे सूचक विधानही बायडन यांनी केले. वाचा : अमेरिकेला निश्चितपणे या युद्धाची झळ बसणार आहे. सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य देत आहोत, असे सांगताना युक्रेनवरील सायबर हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाणार, असा इशारा मात्र त्यांनी दिला. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी सध्यातरी कोणत्याही प्रकारची चर्चा केली जाणार नसल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले. रशियावरील आणखी वाढवण्याची घोषणाही त्यांनी केली. जी-७ देशांची बैठक रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी जी-७ देशांच्या नेत्यांसोबत डिजिटल बैठक सुरू केली. 'जी-७ नेत्यांची बैठक सुरू झाली असून राष्ट्राध्यक्ष बायडन आणि इतर नेते राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या युक्रेनवरील हल्ल्याला त्यांच्या एकत्रित प्रतिसादावर चर्चा करत आहेत, असे व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच व्हाइट हाऊसच्या आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी बायडन यांनी युक्रेनमधील ताज्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली होती. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lxQRig8

No comments:

Post a Comment