मुंबई : अभिनेत्री आणि सैफ अली खानचा धाकटा मुलगा जहांगीर अर्थात जेह याचा पहिला वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. जेहच्या वाढदिवसाला सैफ आणि अमृताची मुलगी सारा अली खान आणि इब्राहिम आवर्जून उपस्थित होते. इतकेच नाही तर साराने वडिलांबरोबरचा आणि भावांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर भरभरून कॉमेन्ट केल्या आहेत. जहांगीरच्या वाढदिवसाच्या दिवशी सारा आणि इब्राहिम सैफच्या घरी गेले. त्यावेळी सैफच्या घरी जेहचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळचे काही फोटो साराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. साराने जे फोटो शेअर केले आहेत त्यात एका फोटोमध्ये सैफ त्याच्या चारही मुलांसोबत दिसत आहे. तर आणखी एका फोटोमध्ये सारा इब्राहिम, तैमूर आणि जेह या तिच्या तिन्ही भावांबरोबर दिसत आहे. या फोटोंमध्ये सारा आणि इब्राहिम जेहबरोबर खूप मस्ती करताना दिसत आहे. इतकेच नाही तर सारा जेहला जेवण भरवतानाही दिसत आहे. दरम्यान, करिनाने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर जेह आणि तैमूरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत जेह तैमूरच्या मागे रांगताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत करिनाने लिहिले, 'दादा माझ्यासाठी थांब आज मी एक वर्षांचा झालोय . चल एकत्र जग फिरुयात...अर्थात आपल्यासोबत सगळीकडे आई येईलच. जेह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'. यानंतर करिनाने इन्स्टाग्रामवर आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये जेह त्याच्या सैफ अली खानसोबत बसला आहे. या फोटोसोबत करिनाने लिहिले की, 'ओके बाबा सुद्धा आपल्यासोबत येतील. आय लव्ह यू.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UwZthmP
No comments:
Post a Comment