: उल्हासनगर आणि डोंबिवलीत श्वानाला चिरडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्राणी मित्रांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. एका भरधाव डंपर चालकाने पाळीव श्वानाला चिरडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्पमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत राणी नावाच्या कुत्रीचा जागीच तडफडून मृत्यू झाला. याप्रकरणी श्वान मालक सागर यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सागर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (in a was crushed by a dumper) अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरातील कालीमाता मंदिराच्या मागे सागर गरजमल हे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे राणी नावाची रॉटविलर जातीची चार वर्षीय श्वान होती. रविवारी सकाळच्या सुमारास सागर हे राणीला घराबाहेर फिरवत असतानाच अचानक भरधाव वेगात एक डंपर आला आणि त्याने त्याने राणीला धडक देत चाकाखाली चिरडलं. अपघाताची ही संपूर्ण घटना सागर यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर सागर यांची मृत श्वान राणी हिची चार अतिशय लहान पिल्ले असून राणीच्या अपघाती मृत्यूमुळे ती आईच्या मायेला पारखी झाली आहेत. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डोंबिवलीच्या पालिका आवारात वाहनाच्या धडकेत भटका श्वान गंभीर जखमी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात एका खाजगी वाहनाने दिलेल्या धडकेत एका श्र्वानाला गंभीर दुखापत झाली. ही घटना सोमवारी दुपारच्या दरम्यान घडली आहे. दरम्यान, डोंबिवली विभागीय कार्यालयातील पत्रकार कक्षात बसलेल्या पत्रकारांना जखमी श्वानाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ प्राणी मित्र निलेश भणगे यांना संपर्क साधला. त्यांनतर काही वेळातच प्राणी मित्रांनी जखमी श्वानाला उपचारासाठी घेऊन गेले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cDPjIhK
No comments:
Post a Comment