अहमदनगर: दारू पिण्यावरून एकाशी भांडण झाल्यानंतर याचा सूड त्याच्या बहिणीवर करून घेतल्याची घटना नगर शहरात घडली आहे. जखमी आई रुग्णालयात, वडील तिच्यासोबत थांबलेले असताना घरी एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केला. त्यांना मदत करणाऱ्यांसह एकाच कुटुंबातील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( after a over a person raped his sister) यातील अल्पवयीन मुलगी आई-वडील आणि भावासह राहते. तिच्या भावाचे दारू पिण्यावरून अनिल चव्हाण याच्याशी भांडण झाले. याचा राग धरून चव्हाण भांडण करण्यासाठी घरी आला. त्याने केलेल्या दगडफेकीत त्या मुलीची आई गंभीर जखमी झाली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरू असल्याने मुलीचे वडीलही तेथे थांबले होते. क्लिक करा आणि वाचा- घरची कामे मुलगीच पहात होती. तिने दिवसभर शेळ्या चारण्याचे काम केले. सायंकाळी घरी येऊन स्वयंपाक केला. आईला रुग्णालयात डबा नेऊन दिला. त्यानंतर तिच्या वडीलांनी तिला दुचाकीवरून पुन्हा घरी आणून सोडले. रात्री ती एकटीच घरात झोपली. क्लिक करा आणि वाचा- रात्री अनिल चव्हाण आणि त्याचे कुटुंबीय तेथे आले. त्यांनी मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा उठवत तिच्यावर अत्याचार केला. आरोपी अनिल चव्हाण आणि त्याचा भाऊ सुनील चव्हाण यांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यावेळी त्यांचे आईवडील सिल्वर चव्हाण आणि वरगा चव्हाण यांनी त्यांना मदत केली. वडील घरी आल्यानंतर त्या मुलीने कोतवाली पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tqr8wLf
No comments:
Post a Comment