मुंबई: काल राज्यात करोनाच्या (Coronavirus) बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली असताना आज मात्र कालच्या तुलनेत दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात २२९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, दिवसभरात ३९५ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज एकूण ०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख २२ हजार ३६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ८८ लाख ४० हजार २०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ७२ हजार ०३२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ०९.९८ टक्के इतके आहे. सध्या राज्यात १८ हजार ६३३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ५६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. क्लिक करा आणि वाचा- याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४३ हजार ७६२ इतकी आहे. मुंबईत आज ७३ नवे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज गुरुवारी ७३ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, गेल्या २४ तासांत एकूण ६४ रुग्ण बरे झाले. मुंबईतील एकूण बरे झालेल्या करोना बाधित रुग्णांची संख्या १० लाख ३७ हजार ५५७ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये आज एकाही करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ६९३ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात आज एकूण ११ नवे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आज गुरुवारी ११ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात ०२, ठाणे महापालिका क्षेत्रात ०४, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ०४, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ०१, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात ०, भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात ०१, मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात ० रुग्ण आढळले आहेत. तर, पालघरमध्ये आज एकही रुग्ण आढळलेला नसून वसई विरार मनपा क्षेत्र आणि रायगडमध्ये प्रत्येकी १ रुग्ण, तर पनवेल मनपा क्षेत्रात आज ०२ नवे रुग्ण आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/NKyJBcS
No comments:
Post a Comment