Breaking

Thursday, March 17, 2022

मनसेने लावला उलटा बॅनर; शिवसेनेवर केली खोचक टीका https://ift.tt/nvyVJWt

डोंबिवली: कल्याण ग्रामीणचे यांनी शिवसेनेचे अभिनंदन करणारे बॅनर ट्विट केले आहे. मात्र, त्यात बॅनरवर मजकूर उलटा छापून पाटील यांनी शिवसेनेवर खोचक टिका केली आहे. होळीच्या निमित्ताने मनसेकडून शिवसेनेवर टीकेच्या रंगाची उधळण करण्यात आल्याने मनसेच्या उलट्या बॅनरचे ट्वीट चर्चेचा विषय ठरला आहे. MNS has sharply criticized Shiv Sena by raising an डोंबिवलीतील निवासी भागातील रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ३६ कोटी रुपये मंजूर केले असल्याचे बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आला होते. मात्र, काम प्रत्यक्षात सुरु झाले नसल्याने मनसेकडून त्यावर टिका करत, बॅनरबाजी करण्यात आली होती. दरम्यान, काम सुरु करा असा आग्रह मनसेने धरला होता आणि काम सुरू नसताना बॅनरबाजी काय करता?, असा सवाल उपस्थित केला होता. १७ फेब्रुवारी रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते रस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मनसे आमदारही उपस्थित होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आता काम सुरु झाल्यावर मनसे आमदारांनी अभिनंदनाचा बॅनर लावावा असा चिमटा काढला होता. त्यावर मनसे आमदारांनी अभिनंदनाचा बॅनर नक्की लावणार असे स्पष्ट केल होते. मात्र अद्याप प्रत्यक्षात अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या अभिनंदनाचा ट्विट केला आहे. क्लिक करा आणि वाचा- या संदर्भात आमदार पाटील म्हणाले की, एमआयडीसीतील रस्ते काँक्रिटीकरणाचे उदघाटन मोठ्या जोरात झालेले होते. हे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले होते. हे काम लवकरात लवकर सुरू करा, लोकांना त्रास होत आहे, असे मी त्या पूर्वीच बोललो होतो. तुम्ही काम सुरू केल्यावर आम्ही तुमच्या अभिनंदनाचे बॅनर लावू. तुम्हाला बॅनर लावावे लागतील आणि ते तयार करून ठेवले आहेत, असे उदघाटन प्रसंगीही पालकमंत्री म्हणाले होते. पण कामे अजून काही चालू झालेले नाहीत. आम्ही विरोधक आहोत. सत्ताधाऱ्यांकडून काम कसे करून घ्यायचे ही आमची जबाबदारी आहे. सक्षम विरोधी पक्षाचे काम सत्ताधाऱ्यांच्या मागे लागून त्यांच्याकडून कामे करून घेणे हे असते. या अनुषंगाने आज होळीचे निमित्त शोधून एक उलटा बॅनर लावला आहे. आता हा डोकं खाली आणि पाय वर करून वाचवा लागेल. आता जेव्हा काम सुरू होईल तेव्हाच आम्ही हा बॅनर सरळ करू. क्लिक करा आणि वाचा- कल्याण फाटा ते पंजाब हॉटेलदरम्यान रस्त्याचे काम पूर्ण, प्रवाश्याचा प्रवास होणार सुखकर शीळफाट्याजवळील कल्याण फाटा ते पंजाब हॉटेल दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडले होते. हा रस्ता नव्याने तयार करण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला होता आणि या रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले. अखेर आज या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आमदार पाटील यांनी आज या रस्त्याची पाहणी केली. दरम्यान, कल्याण-डोंबिवली अंबरनाथ,बदलापूर येथील नागरिक आणि प्रवाशांसाठी हा रस्ता उदयापासून खुला करण्यात येणार असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे पोलिसांनी आणि प्रवाशांनी आमदार पाटील यांचे आभार मानले आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1OJFhy7

No comments:

Post a Comment