Breaking

Thursday, April 14, 2022

राज ठाकरेंच्या उपस्थित पुण्यात पहिले हनुमान चालिसा पठण; राज यांचा 'हिंदूजननायक' असा उल्लेख https://ift.tt/kSF6PJp

म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) हनुमान जयंतीनिमित्त येत्या शनिवारी (१६ एप्रिल) पक्षाचे सर्वेसर्वा (Raj Thackeray) यांच्या हस्ते पुण्यात व सामुहिक (Hanuman Chalisa) पठण आयोजिण्यात आले आहे. कुमठेकर रस्त्यावर खालकर तालीम चौकातील हनुमान मंदिरात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली. ठाण्यातील उत्तर सभेत मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्य सरकारला ३ मे चा अल्टिमेटम दिल्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असेल. (The first of will be recited on April 16 in Pune in the presence of ) क्लिक करा आणि वाचा- खालकर तालीम चौकातील मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी १६ एप्रिल रोजी सांध्यकाळी ६.०० वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. गेले दीड शतक खालकर मारुती मंदिर हे भविकांचे श्रद्धा स्थान राहिले आहे. हे मंदिर जुने झाल्यामुळे आणि एका अपघातात मंदिराची भिंत पडल्यानंतर २० वर्षांपूर्वी मंदिराच्या बांधकामाची सुरुवात राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती. मंदिरात नित्यनियमाने पूजाअर्च्या होमहावन धार्मिक विधी होत असतात. शनिवारी १६ एप्रिलला हनुमान जयंतीचा कार्यक्रम दिवसभर चालणार असून रविवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ११ या वेळात होणाऱ्या महाप्रसाद असणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस आणि हनुमान जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरती आणि सामूहिक हनुमाना चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजक अजय शिंदे यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- राज ठाकरेंचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात सभेत प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातला होता. मशिदींवरील भोंगे न हटवल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावल्या जातील असेही राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुरू केले. राज ठाकरे आपली भूमिका बदलत असून ईडीची नोटीस आल्यानंतर आता त्यांनी भाजपला मदत होईल अशी भूमिका घेतल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली. या टीकेनंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तरसभेचे आयोजन करत मशिदींवरील भोग्यांचा मुद्दा अधिक प्रखरपणे मांडला. येत्या ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली न उतरल्यास मशिदींसमोरच हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला. त्यानंतर पुण्यात पहिलाच हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम राज ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात येणार असून त्यांचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hmnkqMX

No comments:

Post a Comment