Breaking

Friday, September 30, 2022

T-20 World Cup : जसप्रित बुमराहच्या दुखापतीनंतर भारतीय T-२० संघात झाले मोठे फेरबदल; कोण जाणार ऑस्ट्रेलियाला, पाहा https://ift.tt/GlJpy5T

नवी दिल्ली : पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबाबत भारतीय संघात सस्पेन्स कायम आहे. बीसीसीआय अजूनही जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीतून बरा होण्याची वाट पाहत आहे. दरम्यान, बॅकअप आणि नेट बॉलर म्हणून दोन अतिरिक्त वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. हैदराबादचा आणि जम्मू-काश्मीरचा झंझावाती वेगवान गोलंदाज हे भारतीय तुकडीसोबत ६ ऑक्टोबरला पर्थला रवाना होतील. तेथे संघ सुमारे एक आठवडा सराव करेल, त्यानंतर १७ ऑक्टोबरला पहिला सराव सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवला जाणार आहे. ( and will go with team to ) स्पोर्टस्टारने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने याबाबत बातमी दिली आहे. या वृत्तानुसार सध्या बीसीसीआयकडून अशी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. तसे, भारतीय क्रिकेट बोर्डाने अद्याप बुमराहच्या विश्वचषकात जाण्याबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. मात्र, शुक्रवारी सकाळी मोहम्मद सिराजला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेसाठी संघात स्थान देण्याची घोषणा करण्यात आली. क्लिक करा आणि वाचा- दुखापतीशी झुंज देत असलेल्या जसप्रित बुमराहऐवजी मोहम्मद सिराज उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळणार असल्याचे बोर्डाचे सचिव जय शाह यांनी सांगितले होते. सध्या जसप्रीत बुमराह वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली दुखापतीतून सावरत आहे. क्लिक करा आणि वाचा- आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेली की जसप्रीत बुमराह ६ ऑक्टोबर रोजी पर्थसाठी उड्डाण करणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियात त्याला थोडा वेळ मिळेल. किंवा मग त्याला बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे रिपोर्ट करण्यास देखील सांगितले जाऊ शकते. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IWc1kQO

No comments:

Post a Comment