पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पुणे फेस्टिवलच्या उद्गाटन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. यांनी मला ज्यावेळी निमंत्रण दिलं होतं त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. पुण्यात येईपर्यंत उपमुख्यमंत्री झालो आणि इथून निघेपर्यंत आमदार देखील होऊ शकतो ती रिस्क कोण घेईल, असं म्हणत फडणवीस यांनी टोलेबाजी केली. ३४ व्या पुणे फेस्टिवलच्या शुभारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार हेमा मालिनी आणि पुणे फेस्टिवलचे संयोजक सुरेश कलमाडी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, मी मुख्यमंत्री असताना कलमाडी यांनी मला उदघाटनाला बोलावलं होत पण इथं येता येता उपमुख्यमंत्री झालो. मात्र आता आधी बोलून जाण्याची परवानगी घेतलीय नाहीतर इथून जाईपर्यंत उपमुख्यमंत्र्यांचा मंत्री झालो अन मंत्र्यांचा आमदार झालो तर कोण रिस्क घेईल, अशी फटकेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली. राजमाता जिजाऊंच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला आणि पुण्याला नवी ओळख दिली. पुण्यात एकापेक्षा एक समाज बदलणारे खऱ्या अर्थानं लोकांना प्रेरणा देणारी सर्व क्षेत्रातील लोकं पाहायला मिळतात. पुणे फेस्टिवलनं काय केलं हे आपल्याला सांगायचं असेल तर ३४ वर्षापूर्वी आभासी मंच नव्हता त्यावेळी सुरेश कलमाडींच्या टीमनं अभिव्यक्ती, कलाकृती सादर करण्यास मंच उपस्थित करुन दिला होता. पुणे फेस्टिवलमध्ये ज्यांचा गौरव होते ते खूप पुढे जातात. आज ज्यांनी सादरीकरण केलं त्याचं अभिनंदन करतो, असं फडणवीस म्हणाले. राजकारणातील एक बायोडाटा असतो त्यात पुणे फेस्टिव्हल नसतं तर तो माझा बायोडाटा अर्धवट राहिला असता त्यामुळे तुम्ही पूर्ण केला त्याबद्दल मी सुरेश कलमाडी यांनी यांचे आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुणे फेस्टिवलचे संयोजक सुरेश कलमाडी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री असताना त्यांना उदघाटनासाठी बोलावले होते. मात्र, त्यांवेळी जमले नाही ते आज आले. आज उपराजधानी आणि सांस्कृतिक राजधानी एकत्र आल्यात मात्र फरक एवढंच नागपूरच्या विकासाला डबल इंजिन आहे, असं देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी याचा दाखला देत कलमाडी यांनी म्हटलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/EsXIVLJ
No comments:
Post a Comment