ब्रिस्बेन : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला चुका सुधारण्याची ही शेवटची संधी असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात शेवटच्या षटकातील रोमांचक विजयानंतर टीम इंडिया उत्साहात आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध त्याच उत्साहाने उतरेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना कधी होणार?भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना बुधवार, १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना कुठे होणार?भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना द गाबा, ब्रिस्बेन येथे होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सराव सामन्याची नाणेफेक किती वाजता होईल?भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सराव सामन्याचा नाणेफेक दुपारी१.०० वाजता होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना किती वाजता सुरू होईल?भारत आण न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामन्याचा टॉस यावेळी दुपारी १.०० वाजता होणार आहे. टॉस झाल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार आपले संघ जाहीर करतील. दोन्ही कर्णधारांनी आपले संघ जाहीर केल्यावर अर्ध्या तासाचा ब्रेक होईल आणि त्यानंतर हा सराव सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना तुम्ही कुठे पाहू शकता?भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. हॉटस्टारवर तुम्ही या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. आतापर्यंतच्या सरा सामन्यांमध्ये नेमकं काय घडलं, पाहा... विश्वचषकाला सामोरे जाण्यापूर्वी भारताला या सराव सामन्यात प्रयोग करण्याची चांगली संधी असेल. आतापर्यंत भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठे प्रयोग केले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली खेळला नव्हता. पण पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या भन्नाट फलंदाजीमुळे भारताने विजय साकारला होता. दुसऱ्या सराव सामन्यात लोकेश राहुलकडे भारताचे नेतृत्व देण्यात आले होते, पण हा सामना भारताला गमवावा लागला होता. तिसऱ्या सराव सामन्यात भारताने संघातील अनुभवी खेळाडूंना संधी दिली असली तरी यामध्ये त्यांनी बरेच प्रयोग केले होते. या सामन्यात रोहित शर्माने संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीला फक्त एकच षटक दिले होते. या एकाच षटकात शमीने तीन विकेट्स घेतल्या आणि भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघात कोणाला संधी मिळते, कोणते प्रयोग यावेळी केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/d7mpvta
No comments:
Post a Comment