बुलढाणा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर बुलढाण्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली. बुलढाणा जिल्हा ठाकरे यांच्यासोबत असल्याचा आणि लोकमानसही ठाकरेंना अनुकूल असल्याचा गोपनीय अहवाल प्राप्त झाल्यापासून ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे, आज कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना, कार्यकर्त्यांनी ठाकरेंना मेहकरात सभा मागितली. त्यावर ”मी बुलढाण्यात येणार आहे, मेहकरात सभाही घेणार आहे”, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह बुलढाणेकरांना दिले आहे. ही सभा अतिविराट करण्याचा निर्धार पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ठाकरेंची तोफ मेहकरात धडाडणार असल्याने बंडखोरांचे टेन्शन मात्र चांगलेच वाढले आहे, असं जालिंदर बुधवत म्हणाले. दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात इनकमिंग वाढले असून, आगामी निवडणुकांत या पक्षाला चांगले भवितव्य असल्याने, भाजपसह, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित आघाडीचे कार्यकर्तेदेखील या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. आज ‘मातोश्री’वर बुलढाण्यातील पदाधिकार्यांची बैठक आयोजित असता, यावेळी भाजपसह राहणारी इतर पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधले, अशी महिती जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिली. यावेळी संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, वसंतराव भोजने, सह संपर्क प्रमुख दत्ता पाटील, छगन मेहेत्रे, भास्करराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. तसेच, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हेदेखील बंडखोरांच्या गटात सामील झाले असून, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हेदेखील शिंदे गटात आहेत. लोकप्रतिनिधी हे शिंदे गटात गेले असले तरी, कट्टर शिवसैनिक व पदाधिकारी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठेने कायम आहेत. शिवाय, बंडखोरी व इतर राजकीय घडामोडी यामुळे बुलढाणेकर माणसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे, असं जालिंदर बुधवत म्हणाले. हिंदुह्रयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आजही शिवसैनिक जीवाचे रान करून शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करत आहे. आजही निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मुंबई येथे आज दिनांक १८/१०/२२ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आज तुम्ही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहात, त्यामुळेच मला दररोज लढण्यासाठी बळ मिळत असून लवकरच मी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले, अशी माहिती जालिंदर बुधवत यांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IOMPhm2
No comments:
Post a Comment