Breaking

Tuesday, February 7, 2023

भांडणातून घरातील सामानाची तोडफोड; दुसऱ्या दिवशी दुचाकी पेटवली अन् घरही पेटलं, दापोलीत नेमकं काय घडलं https://ift.tt/esZMBpm

रत्नागिरी: दापोली तालुक्यात कोळथरे येथे घराला मोठी आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री घरात जोरदार वाद करून घरातील सामानाची तोडफोड केली होती म्हणून हे सगळे प्रकरण दाभोळ पोलीस ठाण्यात गेले आणि रात्रीच संशयित युसूफ वर एनसी दाखल झाली होती. २४ तासाच्या आत घराच्या मागे असलेली होंडा एक्टिवा गाडी पेटवली आणि त्यामुळे ही जास्तीच भडकली आणि घराचे छप्पर, घरातील अनेक वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. गाडीला आग लावून पळालेल्या संशयित आरोपीला दाभोळ पोलिसांनी संध्याकाळी उशिरा शोधून काढत ताब्यात घेतलं आहे. सुदैवाने यामध्ये या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नाही. दापोली येथे राहणारा आणि सुतारकाम करणारा संशयित युसुफ सुर्वे हा लग्न ठरलेल्या मुलीबरोबर नेहमी वाद करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. युसूफ हा कोळथरे येथे दोन दिवस एका कार्यक्रमा निमित्ताने आला होता. त्यांच्यामध्ये अनेकदा भांडण होत असत दारुचे व्यसन असलेल्या संशयित युसूफ सुर्वे हा घरात काहीही करेल या भीतीने शेजाऱ्यांनी घरातील सिलेंडरही घरातून कालच काढून ठेवले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण, ज्याची भीती होती शेवटी तेच घडले. कोळथरे मोहल्ला येथे ही घराला मोठी आग लागली. दोघांच्या झालेल्या भांडणातून ही आग संशयित युसूफ याने लावल्याची माहिती समोर आली आहे. यात मोठं आर्थिक नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गावात आग लागल्याची माहिती कळताच कोळथरे गावात आंबा बागेत फवारणी करत असलेले ग्रामस्थ विजय आगरकर हे आपल्या बागेतील स्प्रे पंप आणि पाण्याचा पाईप घेऊन तात्काळ घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आणि गावातील ग्रामस्थांनी ही आग विझवण्यासाठी मोठी मदत केली. खेड नगरपरिषदेचा अग्निशमनदलाचा बंब कोळथरे येथे दाखल झाला. मात्र, अरुंद रस्त्यावर खेडचा बंब हा घटनास्थळी पोहोचू शकला नाही. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी घराजवळ असलेल्या एका विहिरीतून पाण्याचा पंप लावून ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न ग्रामस्थांच्या मदतीने सुरू केले होते. ग्रामस्थांच्या मदतीने सायंकाळी उशिरा ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. या सगळ्या घटनेची माहिती मिळताच दुपारी तात्काळ दाभोळच्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशीद हेही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या सगळ्या प्रकरणी आता संशयित युसूफ सुर्वे याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VZStgCz

No comments:

Post a Comment