लंडन: बॉसने एका कर्मचाऱ्याला त्रास देऊन त्याला कामावरुन काढून टाकलं. कर्मचाऱ्याने बॉसची आज्ञा पाळण्यास नकार दिला. त्यानंतर बॉसने त्या कर्मचाऱ्याला काही महिन्यांनंतर जबरदस्ती त्याला नोकरीवरुन काढून टाकलं. त्यानंतर या कर्मचाऱ्याने बॉसविरोधात तक्रार दाखल केली आणि त्याने ही लढाई जिंकली. आता बॉसला या कर्मचाऱ्याला ३० लाख रुपये द्यावे लागणार आहेत, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. इतकंच नाही तर बॉसवर हा देखील आरोप करण्यात आला आहे की तो कर्मचाऱ्याला समलैंगिक असल्याने त्याची खिल्ली उडवत असे.या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधिकरणाने अनेक महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. क्रिस विल्यम्स नावाची व्यक्ती लंडनमधील 'स्टो ब्रदर्स' प्रॉपर्टी मॅनेजमेंट विभागात काम करत होती. 'स्टो ब्रदर्स' कंपनी प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करते. चार वर्ष काम केल्यानंतर त्याच्या बॉसने त्याला कामावरुन काढून टाकलं होतं. मे २०१९ मध्ये एका व्यक्तीने कागदपत्रांशिवाय मालमत्तेत प्रवेश केला. त्यांनी मालमत्तेचे भाडे दिले नव्हते. अशा स्थितीत 'स्टाऊ ब्रदर्स' कंपनीवर मालमत्तेचे भाडे घरमालकाला देण्यासाठी दबाव होता. जेव्हा हे प्रकरण जोर धरू लागलं तेव्हा कंपनीचे संचालक अँड्र्यू गॉड यांनी कर्मचारी क्रिस विल्यम्सला कागदपत्रांशी संबंधित काम करण्यास सांगितले. पण, क्रिसने हे करण्यास नकार दिला. यामुळे बॉस संतापले आणि त्यानंतर त्यांनी इतर कर्मचाऱ्यांसमोर क्रिस विल्यम्सचा अपमान केला, तो जवळपास वर्षभर असंच करत राहिला. या काळात त्यांचा केवळ अपमानच झाला नाही, तर त्यांचा पगारही वाढला नाही. इतकंच नाही विल्यम्सला कोणत्याही पुरस्कार सोहळ्याचं निमंत्रणही देण्यात आलं नव्हतं. तसेच, त्याच्यावर चोरीरा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर २०२१ मध्ये त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. त्यानंतर विल्यम्सने बॉसविरोधात छळ आणि भेदभावाचा आरोप करत त्यांच्याविरोधात खटला दाखल केला. यामध्ये समलैंगिक असल्याने बॉस खिल्ली उडवत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायाधिकरणाने ही वागणूक चुकीची असल्याचं सांगितलं असून क्रिसला ३० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wW3leZm
No comments:
Post a Comment