अकोला: अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातल्या दिग्रस बुझरूक गावात ग्रामदैवत असलेल्या सोपीनाथ महाराजांची यात्रा. याठिकाणी एका ५५ वर्षीय व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला. इथे कार्यरत असलेल्या चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांनी त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांना सीपीआरही देण्यात आला, पण त्यात अपयश आलं. त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला. विलास सहदेव मानकर (राहणार वाडेगाव ता. बाळापुर, जि. अकोला) असं मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान मानकर यांना वाचवण्यासाठी पोलीस करीत असलेली धडपड याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातल्या दिग्रस बुझरूक गावात ग्रामदैवत असलेल्या सोपीनाथ महाराजांची जत्रा (यात्रा) भरते. तब्बल पाच दिवसांची ही यात्रा असते. शुक्रवारी यात्रेचा शेवटचा दिवस होता. या यात्रेत हजारो संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते, यातच जिल्ह्यातील वाडेगाव येथील रहिवासी विलास सहदेव मानकर हेही कुटुंबीयांबरोबर सोपीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि छातीत दुखनं सुरू झाल्याने ते खाली कोसळले. दरम्यान, यावेळी मंदिर परिसरात म्हणजेच यात्रेत कर्तव्य बजावत असलेले त्यांनी पोलिसांच्या ही बाब कानावर पडली. लागलीस एपीआय योगेश वाघमारे यांनी इथे धाव घेतली आणि विलास मानकर यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले.आपल्या दोन्ही हाताने जोर-जोरात छाती दाबून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. यासह अनेक प्राथमिक उपचारही इथे करण्यात आले. त्यानंतर त्यांना लागलीच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी इथं त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान पोलिसांनी मानकर यांना वाचवण्यासाठी केलेली धडपड. इथे उपस्थित असलेल्या काही भाविकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रकरण केले अन् आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं वायरल होतो आहे. विलास मानकर हे मंदिर परिसरात वावरत असताना अचानक कोसळले आणि क्षणार्धात त्यांचा श्वास थांबला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. मानकर हे शेतकरी असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, याप्रकरणी चान्नी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZhyoDng
No comments:
Post a Comment