पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील आणि यांच्यातील सुप्त संघर्ष असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे आधी जयंत पाटील यांचे वाढदिवसाच्या दिवशी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आणि त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोरच अजित पवार यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले. यावरून आता भाजप नेत्याने आमदार राम शिंदे अजित पवार आणि यांना चिमटा काढला आहे. ते आज चिंचवड मध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचाराला आले असता महाराष्ट्र टाइम्सशी ऑनलाइनशी बोलताना त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे राष्ट्रवादीमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. जोपर्यंत शरद पवार आहेत तोपर्यंत अजित पवार हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार देखील होऊ शकत नाही. इतकंच काय तर राष्ट्रवादी ५०-६० आमदारांच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा दावेदार किंवा उमेदवार ते घोषित करू शकत नाही, अशी दयनीय परिस्थिती राष्ट्रवादीची यापुढे होणार आहे, असा घणाघात राम शिंदे यांनी केला आहे. तर संजय राऊत यांना आलेल्या कथित धमकी प्रकरणी देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत सकाळ दुपार संध्याकाळ मीडिया चालवायचे पण सरकार गेल्यापासून त्यांचा टीआरपी डाऊन झाला. आता त्यांना कोणी विचारतच नाही. त्यामुळे त्यांना थ्रेट होण्याचं काहीच कारणच नाही. आपल्या बातमीकडे लक्ष वेधण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं शिंदे म्हणाले आहेत.रोहित पवार यांचीही घेतली फिरकी दरम्यान, राष्ट्रवादीचे रोहित पवार हे नुकतेच राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी चिंचवड मध्ये आले असता ते चुकून राहुल कलाटे यांच्याऐवजी नाना काटे असं बोलून ते वीस तीस हजार मतांच्या पुढे जाणार नाहीत असे म्हणाले होते. यावरून देखील राम शिंदे यांनी रोहित पवार यांची फिरकी घेतली आहे. रोहित पवार इथं येऊन म्हणतात की नाना काटे वीस तीस हजाराच्या पुढे मतं घेऊ शकत नाही. त्यामुळे रोहित पवार हे अजित पवार यांच्या विरोधी भूमिका घेतात की काय अशी शंका आता चिंचवड मतदार संघात उपस्थित होत आहे. चिंचवड मध्ये येऊन आपला उमेदवार हा २०-३० हजारांच्या पुढे जाऊ शकत नाही, असं म्हणणं म्हणजे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली जाण असच आहे, असं म्हणत राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनीच शिवसेना संपवली- राम शिंदे तर शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर शिवसेना संपवण्याचे काम शरद पवार यांनीच केल्याचा आरोप सुद्धा आज राम शिंदे यांनी महाराष्ट्र टाईम ऑनलाईनशी बोलताना केला आहे. पहिल्यांदा शिवसेना जर कोणी फोडली असेल तर ती शरद पवारांनी फोडली. आता शिवसेना पवारांच्या नादी लागली आणि ठाकरे घराण्याची शिवसेनाच निघून गेली. १९८० च्या दशकापासून पवार घराण्याला शिवसेनेचा जो त्रास झालाय त्याचं उट्ट पवारांनी आत्ता काढलं की काय असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे, असंही शिंदे म्हणाले. दुसरीकडे गिरीश बापट हे आजारी असताना भाजपने त्यांना प्रचारात उतरवलं आता भाजप गिरीश बापट यांच्या पक्षनिष्ठेची परीक्षा पाहत आहे का, असा प्रश्न विचारल्यावर राम शिंदे म्हणाले, 'लोकांची इच्छा होती की बापट यांनी आलं पाहिजे भेटलं पाहिजे. तो बापट यांचा पारंपारिक मतदार संघ आहे. त्यामुळे ते स्वतःहून त्या प्रचारामध्ये गेले. याबाबत आमच्यावर टीका करणाऱ्यांनी हेही पाहावं की सलाईनच्या नळ्या आणि बँडेज घेऊ पवार देखील लीलावतीतून थेट शिर्डीच्या पक्षाच्या मेळाव्यात गेलेच होते. तर बारामतीचे प्रभारी आणि आता चिंचवडमध्ये प्रचारासाठी आलेल्या राम शिंदे यांनी मी पवारांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं देखील म्हटलं आहे. पवार मला टक्कर द्यायला कर्जत जमखेडमध्ये आले. आता मी ही पुण्यात आलोय. मलाही काय जमतं ते बघतो. मी बारामतीचा प्रभारी आहे. आता चिंचवडमध्ये आलोय. त्यामुळे जमेल तेवढा त्यांचा कार्यक्रम करणार आहे, असं देखील राम शिंदे म्हणाले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1airdtY
No comments:
Post a Comment