Breaking

Friday, February 24, 2023

बापाच्या खुनाचं कारण ऐकून नात्यांवरील विश्वास उडेल, दोन पोरांनी जे केलं ते वाचून संतापाल https://ift.tt/nJP5MEk

बुलंदशहर: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये नात्यांना काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे वादानंतर दोन मुलांनी मिळून आपल्यात वडिलांचा जीव घेतला आहे. या मुलांनी आपल्याच वडिलांना बेदम मारहाण केली ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि वडिलांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अगौटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकबरपूर रैना गावात मृत सतीश हे राहतात. त्यांचं आणि त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद झाला. हा वाद वाढतच गोला. त्यामुळे सतीश हे ट्रॅक्टर घेऊन उसाच्या शेतात गेले. त्यांचे दोन मुलं राहुल आणि पारुष हे दोघेही त्यांच्या मागोमाग शेतात पोहोचले. तिथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. राहुल आणि पुरुष हे दोन्ही मुलं आणि राहुलचा मेहुणा ललित ही सतीश यांच्याकडे उसाच्या पैशांची मागणी करू लागले.जेव्हा सतीश हे ऊस टाकायला शेतात गेले तेव्हा हा सारा प्रकार घडला. पोरांनी पैशांची मागणी केल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर या तिघांनी सतीश यांच्यावर लाठ्यांनी हल्ला चढवला. त्यांनी वडिलांना इतकी मारहाण केली त्यात जबर मार लागून त्यांचा जागीच जीव गेला. पोलीस ठाण्याचे प्रभारी अगुता जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, माहिती मिळताच त्यांनी गावात पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे त्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी राहुलला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कसून तपासणी करत आहेत. तसेच, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/b2Utu3F

No comments:

Post a Comment