Breaking

Thursday, February 9, 2023

घरासमोर लावलेली कार घेऊन पळ काढला, पण एक चूक अन् घोळ झाला... https://ift.tt/raFYi9Q

परभणी: घरासमोर लावलेली कार चोरीला गेल्यानंतर जीपीएसच्या सहाय्याने गाडीचा शोध घेण्यात आला. कार चारठाण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंठा, चारठाणा पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. पोलीस मागे लागल्याचे पाहून चोरटे चारठाणा फाटा येथे कार उभी करुन पसार झाले. वेळीच हालचाल केल्याने चोरी होत असलेली कार मिळून आली. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.रात्री जाग आली, पाहिलं तर गाडी गायबया विषयी अधिक माहिती अशी की, मंठा येथील रहिवाशी मुंजाजी काळे हे भाड्याने गाडी लावण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या ताब्यातील एम.एच. ३० ए.झेड. ००७० ही गाडी - आपल्या घरापुढे लावली होती. रात्री ३ वाजेच्या सुमारास उठून पाहिल्यावर त्यांना गाडी दिसून आली नाही. वाहन चोरीला गेल्याची माहिती मंठा पोलिसांना देण्यात आली. जीपीएस यंत्रणा तपासली असता वाहन सदर चारठाण्याच्या दिशेने जात असल्याचे लक्षात आले. चोरट्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग, मध्येच गाडी सोडून चोरटे पसारमंठा पोलीस, गाडी मालक यांनी पाठलाग सुरु केला. चारठाणा पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पिंप्री येथे गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चोरटे थांबले नाही. पोलीस मागे लागल्याची देशमुख, शाम गायके, कानकुन लागल्याने चोरटे चारठाणा फाटा येथील शिवाजी चव्हाण यांच्या घरासमोर गाडी उभी करन पसार पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले. ही कारवाई सह पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, देशमुख, शाम गायके, संदिप राठोड, प्रदिप आढाव, कालवणे, वानरे, आचार्य, वाघमारे, राऊत, गरुड, पोलीस मित्र हरी गीते, रामकृष्ण मस्के, प्रभाकर कुम्हे, विजय क्षीरसागर यांनी केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tf13UD4

No comments:

Post a Comment