Breaking

Friday, March 10, 2023

रंग खेळण्याच्या बहाण्याने तरुणांकडून गैरवर्तन, होळीसाठी भारतात आलेल्या तरुणीसोबत भयंकर प्रकार https://ift.tt/gkwfJFG

नवी दिल्ली: होळीदरम्यान महिलांवरील अत्याचाराशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. असाच एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय. यामध्ये अनेक मुलं भर रस्त्यावर एका जपानी मुलीसोबत गैरवर्तन करताना दिसत आहेत. खेळण्याच्या, रंग लावण्याच्या नावाखाली हे तरुण त्या मुलीची सर्वांसमोर खुलेआम छेड काढताना दिसत आहेत. रंग लावण्याच्या बहाण्याने हे तरुण या परदेशी मुलीसोबत अश्लील कृत्य करत आहेत. अनेकांकडून संताप व्यक्तसोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी हा लैंगिक छळ असल्याचंही म्हटलं आहे. तसेच, या तरुणांवर कारवाई करण्याचीही मागणी जोर धरु लागली आहे.खास होळी खेळण्यासाठी पहिल्यांदाच भारतात आली होती पहिले या जपानी तरुणीनेच तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर तिने तो हटवला. पण, सध्या तो व्हिडिओ वेगवेगळ्या अकाऊंटवरुन शेअर केला जात आहे. ही घटना देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील पहाडगंज येथील असल्याची माहिती आहे. ही तरुणी खासकरुन होळी खेळण्यासाठी पहिल्यांदा भारतात आली होती. मात्र, या तरुणांनी तिच्यासोबत जे केलं ते अत्यंत भयानक आणि संतापजनक आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक मुलगा या तरुणीला घट्ट पकडून तिच्या दोन्ही गालावर रंग लावताना दिसत आहे. तेवढ्यात शेजारी उभा असलेला मुलगा जोरात तिच्या डोक्यावर अंड फोडतो. तेवढ्यात दुसरा मुलगा येऊन तिला पकडतो आणि त्यानंतर तिच्यावर रंगाचा स्प्रे देखील मारला जातो. अशाच प्रकारे तिथे उपस्थित अनेक मुलं तिला रंगवतात, पकडून ठेवतात, हे सारं अत्यंत संतापजनक आहे. तरुणी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, नाही, नाही म्हणते. तेव्हा पुन्हा एकदा एक मुलगा तिला होळीच्या शुभेच्छा देत तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोतेव्हा ती तरुणी त्याला थोबाडीत मारते. अनेकांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. याबाबत लोक संताप व्यक्त करत आहेत. तसेच, काँग्रेस नेत्या पंखुरी पाठक यांनी तो रिट्विट केला आहे आणि म्हटले आहे की, 'तुम्ही मित्र, कुटुंब आणि शेजाऱ्यांसोबत सणाचा आनंद लुटता आणि तुम्हाला असं वाटतं की असे आणखी दिवस असावेत. मग दुसऱ्या दिवशी ट्विटर उघडल्यावर तुम्हाला हे भयानक व्हिडिओ दिसतात. तेही भारतातील.' यावर बलात्कारविरोधी कार्यकर्त्या योगिता भयना म्हणाल्या, 'हे बघून फार वेदना होतात! मला समजत नाही की पालक आपल्या मुलांना कसे संस्कार देतात - ही घृणास्पद वागणूक आहे.' सोशल मीडियावरून या व्हिडिओची माहिती मिळाल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हणणं आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील पहाडगंजचा असल्याचं त्यांनी सांगितलं. संबंधित मुलीपर्यंत पोहोचता यावे यासाठी जपानच्या दूतावासाशी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, या घटनेबाबत दिल्ली पोलिसांकडे अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असंही पोलिसांनी सांगितलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xmynz2v

No comments:

Post a Comment