Breaking

Friday, May 26, 2023

Crime Diary: कचऱ्यात डोकं, फ्रीजमध्ये हात-पाय अन् पेटीत धड; श्रद्धा मर्डरपेक्षाही भयंकर मर्डर मिस्ट्री https://ift.tt/TLM683E

नवी दिल्ली : १६ मे २०२२ चा दिवस जेव्हा दिल्लीमध्ये श्रद्धा हत्याकांड झालं. या हत्येच्या बरोबर ३६५ दिवसांनी दिल्लीपासून १५८३ किमी दूर हैदराबादमध्ये अशीच एक दुसरी घटना समोर आली आहे. जिथे १७ मे २०२३ रोजी कचऱ्याच्या ढिगार्‍यातून एका महिलेचे छिन्नविछिन्न अवस्थेत शीर सापडले. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करताच असं सत्य समोर आलं, ज्याने सगळ्यांनाच सून्न केलं.

पॉलिथिनमध्ये सापडले महिलेचे कापलेले डोके...

हैदराबाद शहरात तिगलगुडा रोडवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना साफसफाई करताना काळ्या रंगाचं पॉलिथिन आढळलं. हे पॉलिथिन उघडून पाहिलं असता त्यामध्ये चक्क एक मानवी डोकं आढळलं. यामुळे कर्मचारी खूप घाबरले आणि तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढचा तपास सुरू केला. पोलिसांनी सगळ्या पोलीस स्थानकात याची माहिती दिली. इतकंच नाहीतर शहरातले तब्बल ४५० सीसीटीव्ही तपासले. अशात एका आठवड्याच्या प्रयत्नानंतर अखेर डोकं कोणाचं आहे याचा शोध लागला. संबंधित डोकं हे दिलसुखनगर इथे राहणाऱ्या ५५ वर्षीय यारम अनुराधा रेड्डी यांचं होतं.

पतीच्या निधनानंतर अनुराधा चंद्रमोहनसोबत राहत होती...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधाचं लग्न झालं होतं. पतीच्या निधनानंतर ती १५ वर्ष एकटीच राहिली. यानंतर चंद्रमोहन नावाच्या व्यक्तीसोबत तिची ओळख झाली. चंद्रमोहन हा अनुराधापेक्षा ७ वर्षांनी लहान होते. पतीपासून विभक्त असल्यामुळे अनुराधाची चंद्रमोहनशी जवळीक वाढली आणि ती त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागली. अशात अनुराधा अचानक गायब झाली.

फ्रिजमध्ये हात-पाय आणि धड सापडलं...

चंद्रमोहनचा पत्ता सापडताच पोलिसांनी त्याचं घर गाठलं. जिथे चंद्रमोहन तर सापडला नाही पण अनुराधाच्या हत्येचा भयंकर उलगडा समोर आला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता रेफ्रिजरेटरमधून अनुराधाचे कापलेले हात आणि पाय सापडले. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एका लोखंडी ट्रंकमधून पोलिसांना अनुराधाचे धडही सापडले. यानंतर पोलिसांनी सगळी सूत्रं फिरवली आणि चंद्रमोहन याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला काहीच कबुल करण्यासाठी तो तयार नव्हता. पण अखेर त्याने आपल्या गुन्ह्यांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली.

मृतदेह कापण्यासाठी खरेदी केलं दगड कापण्याचं यंत्र...

चंद्रमोहन याने पोलिसांनी सांगितले की, १२ मे रोजीच त्याने अनुराधाची चाकूने वार करून हत्या केली. यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने बाजारातून दगड कापण्याचं यंत्र विकत घेतलं. या मशीनच्या मदतीने त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते शहरातल्या वेगवेगळ्या भागात फेकण्याचं ठरवलं. श्रद्धा मर्डर केसमधूनच त्याला ही आयडिया आल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे.

कर्जबाजारीपणामुळे रचला अनुराधाच्या हत्येचा कट

आरोपी चंद्रमोहन याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अनुराधा त्याच्या घराच्या तळमजल्यावर राहत होती. आणि तो स्वत: पहिल्या मजल्यावर त्याच्या आईसोबत राहत होता. नर्स म्हणून काम करण्यासोबतच अनुराधा लोकांना पैस व्याजावर द्यायची. या साईड बिझनेसमुळे अनेकदा तिच्याकडे रोख रक्कम असायची. २०१८ मध्ये चंद्रमोहनने अनुराधाकडून ७ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र, आतापर्यंत त्याने यातला एकही रुपया परत केला नाही. तर दुसरीकडे अनुराधाने पैशांसाठी चंद्रमोहनकडे तगादा लावला. ती रोज त्याच्याकडे पैसे मागायची आणि त्यासाठी त्याला खूप त्रास द्यायची. या रोजच्या भांडणाला कंटाळून चंद्रमोहन याने अनुराधाला आपल्या मार्गातून बाजूला करण्याचं ठरवलं. अशात श्रद्धा मर्डर केसमधून त्याला अशा पद्धतीने हत्या करण्याचं डोक्यात आलं. पोलिसांनी या सगळ्या उलगड्यानंतर चंद्रमोहन याला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/n5GFRgH

No comments:

Post a Comment