Breaking

Tuesday, June 27, 2023

मडगव-मबई वद भरत CSMTमधय दखल परवशच सवगत CM शद यन सधल सवद https://ift.tt/epIcZPy

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ९ वर्षे देशात सुशासनाची, जनसेवेची गेली आहेत. याचा एकभाग म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे सर्वांनी स्वागत करायला हवे. केंद्राप्रमाणे राज्य सरकार देखील रेल्वे प्रकल्पासाठी आग्रही आहे. नवे सरकार स्थापनेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत रखडलेल्या रेल्वे प्रकल्पाला निधी देत प्रकल्प मार्गी लावले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे आणि प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी विशेष कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कोकणवासियांसह गोव्यात जाणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना जलद आणि वेगवान पर्याय वंदे भारतमुळे उपलब्ध होणार आहे. मडगाव आणि मुंबई दरम्यान अंतर कापण्यासाठी अकरा-बारा तास लागतात. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसमुळे हे अंतर अवघ्या आठ तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या तीन ते चार तासांची बचत होणार आहे. सोलापूर, शिर्डी, अहमदाबाद, नागपूर आणि बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस राज्यात धावत आहेत. कोकणातील पर्यटनाला देश-विदेशातील पर्यटकांचा वर्दळ वाढविण्यासाठी जलद आणि आरामदायी सुविधा मिळण्यासाठी रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये अतिरिक्त थांबा द्यावा, अशी मागणी मंत्री दीपक केसरकर यांनी केली. राणी कमलापती (भोपाळ) स्टेशनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवत प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या केल्या आहेत. देशात सध्या २३ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या सर्व राज्यात वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/M5o7PhU

No comments:

Post a Comment