Breaking

Tuesday, June 27, 2023

दरड कसळलयन आबनळ घटबबत तज अपडट समर तमहण मरग परवस करणयच सचन https://ift.tt/KJ0rGD5

रायगड : जिल्ह्यात पोलादपूरजवळ काही मिनिटांपूर्वी पुन्हा मोठी दरड कोसळल्याने खळबळ उडाली आहे. आंबेनळी घाटाजवळ प्रतापगडाच्या पायथ्याजवळ पोलादपूर हद्दीत मोठी दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळातच पोलादपूर प्रशासनाची टीम पोहोचली आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.घटनास्थळी अद्यापही दरड कोसळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरडीमुळे कोणतेही मोठे नुकसान झाले आहे किंवा कसे हे मात्र कळू शकलेले नाही. याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. मात्र तूर्तास तरी कोणतेही नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दगडं खाली येत असल्याने नेमका अंदाज प्रशासनालाही लावता आलेला नाही. दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. आंबेनळी घाटात दोन दिवसांपासून दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे या घाटातील वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेतल्या जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान, रायगड पोलिसांकडून प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंटजवळ दरड कोसळली असल्याने आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रवाशांनी ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या मर्गाचा अवलंब करावा, अशी सूचना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केली आहे. रायगड पोलिसांचे पथक, पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. महाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता व पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे व कर्मचारी जेसीबी व अन्य साहित्य घेऊन घटनास्थळजवळ हजर आहेत. मात्र या ठिकाणी छोटे मोठे दगड खाली येण्याचा प्रकार सुरूच आहे. आंबेनळी घाटाबाबत तालुका व जिल्हा प्रशासन उद्या चर्चा करून मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाडकडून पुण्याकडे जाणारा वरंद घाटातील वाहतुकी बाबतही मोठा निर्णय घेतला जाणार आहे. या घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींवर महाडचे महसूल उपविभागीय अधिकारी डॉ. बनापुरे हेही लक्ष ठेवून आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/W9yLV3t

No comments:

Post a Comment