लातूर : शिक्षण क्षेत्रातील लातूर पॅटर्नचा दबदबा पाहता केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे राज्याबाहेरूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी लातूरला येत आहेत. त्यामुळे मुला-मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एकत्रित वावर असल्याने परस्परांमध्ये आकर्षण निर्माण होऊन अनेक विद्यार्थी कॉपी शॉप हॉटेल्सचा आधार घेत गैरवर्तन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था तसेच लैंगिक गैरकृत्य रोखण्याच्या दृष्टीने लातूर शहरासह जिल्ह्यात असणाऱ्या कॉफी शॉप आणि हॉटेल्सवर निर्बंध घालण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कॉपी शॉप हॉटेल्स चालकांवर प्रभावी निर्बंध नसल्याने गैरकृत्यांना चालना मिळत आहे. विद्यार्थ्यांना जादावेळ एकांतात बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देत त्यांच्याकडून जादा शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे लैंगिक गैरकृत्यास चालना मिळत आहे. अनेकदा पोलिसांच्या निदर्शनास गैरप्रकार येऊन अनेक कॉफी शॉप, हॉटेल्सवर कारवाईही करण्यात आली आहे. मात्र कठोर निर्बंध नसल्याने, असे प्रकार शहरात वाढत असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस प्रशासनाला मिळत होत्या. त्या अनुशंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील कॉफी कॅफे शॉप, हॉटेल यांच्यावर निर्बंधाबाबतीत नियमावलीची सूचना जारी करण्याचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या प्रस्तावाची दखल घेत लातूरचे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी कॉफी कॅफे शॉप, हॉटेल बाबत नियमावलीची अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये आता लातूर जिल्ह्यातील कॉफी कॅफे शॉप, हॉटेल यांना पुढील प्रमाणे नियमांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने नियम जारी केले आहेत. या नियमांची कठोर अंमलबजावणी लातूर पोलिसांकडून करण्यात येणार आहे. घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन लातूर पोलिसांकडून व्यवसायिकांनी करण्यात येत आहे. नेमके काय आहेत निर्बंध? १) कॉफी कॅफे (कॉफी शॉप), हॉटेलमधील पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असणे बंधनकारक आहे२) कॉफी कॅफे (कॉफी शॉप) व हॉटेलमधील सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांचे सहज दृष्टीस पडतील असे असावेत३) कॉफीशॉप, हॉटेलमधील बैठक व्यवस्था सर्व ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी४) कॉफीशॉप, हॉटेलमध्ये अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट करण्यात येऊ नये ५) कॉफीशॉप, हॉटेलमध्ये सक्षम प्राधिकार्यासाठी भेट पुस्तिका (व्हिजीट बुक) ठेवावे.६) कॉफीशॉप हॉटेलमध्ये डेक, डॉल्बी, व इतर ध्वनीक्षेपण व्यवस्था प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणारी नसावी७) कॉफीशॉप, हॉटेलमध्ये धुम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे८) कॉफीशॉप, हॉटेल शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच चालू राहतील याची काटेकोरपणे काळजी घ्यावी.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HRuNlWm
No comments:
Post a Comment