Breaking

Tuesday, June 27, 2023

Railway News :रलव परवशसठ आणख एक गड नयज पण सथनकबबत मठ नरणय वशष गडयबबत अपडट https://ift.tt/wBOvEie

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मुंबई-दिव्याहून ये-जा करणाऱ्या ८० रेल्वेफेऱ्यांना पेण स्थानकात थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे पेण आणि परिसरातील प्रवाशांची पनवेलपर्यंतची पायपीट वाचणार आहे.मुंबई-कोकण मार्गावर गणेशोत्सव काळात धावणाऱ्या नियमित रेल्वेगाड्या पूर्ण आरक्षित झाल्या आहेत. अनेक गाड्यांची प्रतीक्षायादीतील तिकीट विक्री थांबवण्यात आली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोईसाठी १५६ विशेष रेल्वेफेऱ्या चालवण्याची घोषणा केली. त्यापैकी गाडी क्रमांक ०११७१/२ सीएसएमटी-सावंतवाडी विशेषच्या ४० फेऱ्या आणि गाडी क्रमांक ०११५३/४ दिवा-रत्नागिरी मेमूच्या विशेष ४० फेऱ्यांना पेण स्थानकात थांबा देण्यात आला आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेस १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान रोज सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल आणि दुपारी २.२० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. गाडीचा परतीचा प्रवास दुपारी ३.१० वाजता सुरू होणार असून मुंबईत दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता संपणार आहे.दिवा-रत्नागिरी मेमू १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत दिवा स्थानकातून सकाळी ७.१० वाजता सुटेल आणि दुपारी २.५५ वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. रत्नागिरीहून दुपारी ३.४० वाजता सुटणारी गाडी दिव्यात रात्री १०.४० वाजता पोहोचणार आहे.पेण हे सुबक आणि रेखीव गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. मेल-एक्स्प्रेसला थांबा दिल्यामुळे पेणमधील नागरिकांसह मूर्तिकारांनाही मोठा फायदा होणार असल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे.

सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेसचे थांबे

- दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

दिवा-रत्नागिरी मेमूचे थांबे

- रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांचं आरक्षण संपल्यानं अनेकांना तिकीट मिळालं नव्हतं. आता रेल्वेनं १५६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/haIASXw

No comments:

Post a Comment