सोलापूर: बीआरएस पक्षाचे अर्थमंत्री हरीश राव, तेलंगणाचे उत्पादन शुल्क आणि क्रीडा पर्यटन मंत्री मंत्री श्रीनिवास गौड आणि तेलंगणाचे ऊर्जामंत्री जगदीश्वर रेड्डी यांनी सोमवारी सायंकाळी भाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या निवासस्थानी नागेश वल्याळ यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांची भेट यांनी घेतली. सोलापुरातील बीआरएस नेत्यांच्या भेटीगाठी झाल्याने सोलापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भारत राष्ट्र समिती पक्षाने सोलापुरातील राजकीय वातावरणात हस्तक्षेप केल्याने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. बीआरएसच्या एन्ट्रीने सोलापुरातील आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीचा मोठा नेता बीआरएसच्या गळाला लागला आहे. भविष्यात पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि बीआरएस अशी लढत पाहायला मिळणार आहे.सोलापुरातील माजी खासदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांचे पुत्र आणि भारतीय जनता पार्टीतील माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या निवासस्थानी बीआरएस पक्षाच्या नेत्यांनी सोमवारी रात्री भेट घेतली. तेलंगणा राज्य सरकारमधील अर्थमंत्री हरीश राव आणि अन्य मंत्र्यांनी भेट घेतली. यानंतर त्यांच्यासोबत औपचारिक भेट झाली आहे. पक्ष प्रवेशाबाबत मी काही बोलणार नाही. तेलंगणाच्या मंत्रिमंडळात आमचे पाहुणे आहेत. मी भाजप सोडून कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा दुजोरा नागेश वल्याळ यांनी दिला आहे. नागेश वल्याळ यांच्यासह तेलंगणामधील तिन्ही मंत्र्यांनी जवळपास अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली केली.याबाबत माहिती समोर आली नाही. बीआरएस पक्षाच्या एन्ट्रीने सोलापुरातील अनेक कार्यकर्त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. पूर्व विभागातील मतदार हे तेलगू भाषिक आहेत. आगामी निवडणुकीचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून सोलापुरात बीआरएस पक्षाने मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोलापुरातील काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बीआरएस पक्ष वाढीसाठी सोलापूरची जबाबदारी धर्मण्णा सादुल यांच्याकडे देण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जात होते. बीआरएसने वेगवेगळ्या राज्यात पक्ष विस्तार करत सर्वच पक्षातील नेत्यांना आमंत्रण दिले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8uLaVnQ
No comments:
Post a Comment