पुणे :पुण्यात फॅशन डिझायनिंगच शिक्षण घेणाऱ्या कोथरुड परिसरातील एका विद्यार्थिनीवर एका तरुणानं एकतर्फी प्रेमप्रकरणातून पाठलाग करुन कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकांच्या सतर्कतेनं ती बचावली. हा सगळा थरार सदाशिव पेठेत वामनारव शेडगे रस्त्यावर घडला. आरोपीच्या तावडीतून वाचवल्यानंतर युवकांनी आरोपीला विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात दिलं. शंतनू जाधव, राहणार डोंगरगाव, मुळशी तालुका या युवकानं संबंधित तरुणीचा पाठलाग करुन कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. युवकानं कोयत्यानं केलेल्या हल्ल्यात मुलगी आणि तिच्यासोबतचा मित्र देखील जखमी झाला आहे. त्याचं नाव शेखर सगळगिळे असं आहे. नेमकं काय घडलं? तरुणीच्या मित्रानं सांगितलं वाद कसा सुरु झाला? विश्राम बाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीचा मित्र देखील जखमी झाला असून त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आलं आहे. पोलिसांनी शंतनू जाधव याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत जखमी झालेली आणि मुलगी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकमेकांच्या संपर्कात होते. तिनं काही कारणांमुळं त्याच्याशी बोलणं बंद देखील केलं होतं. १९ वर्षीय तरुणी फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेते. जखमी झालेला मित्र आर्किटेक्चरचा डिप्लोमा करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएलच्या बसमधून ती तरुणी ग्राहक पेठ येथील थांब्यावर टिळक रोडला उतरली. त्यावेळी शंतनू जाधव तिची वाट पाहत थांबला होता. तो तरुणीच्या जवळ गेला आणि तिच्याशी वाद घालू लागला. त्यांच्यात झालेल्या वादाच्या कारणावरुन जाब विचारत होता. त्यानंतर तरुणीनं तिच्या मित्राला फोनवरुन याची माहिती दिली. तरुणीच्या मित्रानं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, टिळक रोडवरुन ते दोघे पेरुगेटकडे निघाले होते. शंतनू जाधव त्यांचा पाठलाग करत होता, त्यांनं आमच्या गाडीला धक्का दिला. त्यानंतर त्यानं त्याच्या बॅगेतून कोयता काढला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यानं कोयत्यानं वार केलं. त्यानंतर त्यानं मैत्रिणीचा पाठलाग केला, असं शेखर सगळगिळे यानं सांगितलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vOsu7Dh
No comments:
Post a Comment