अंबरनाथ : जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असतानाच, सर्वाधिक पावसाची नोंद असलेल्या अंबरनाथ तालुक्यात जोरदार पाऊस कोसळल्याने बुधवारी अंबरनाथ शहरातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर उल्हासनगर हद्दीतील वालधुनी नदीत सापडला आहे. राहील शेख (वय २८, रा. अंबरनाथ ) असे नदी पात्रात सापडलेल्या मृत तरुणाचे नाव आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना आला आहे. शिवाय अनेक शहरातील नाले. ओढे तुडंब भरून वाहत असून बुधवारी तर बदलापुर, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान अंबरनाथच्या जुना भेंडी पाडा परिसरात राहणारा २८ वर्षीय राहील शेख हा तरुण पोहण्यासाठी नाल्यात उड्या मारत होता. मात्र पुरामुळे नाल्याच्या पाण्याला प्रवाह जास्त असल्याने तो वाहत पत्रात गेला होता. दोन दिवस प्रशासन त्याचा शोध घेत होते, अखेर दोन दिवसानंतर राहीलचा मृतदेह वालधुनी नदीत आढळून आला. यासंदर्भाची माहिती स्थानिकांनी उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत हा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तसपाणीसाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रवाना केला. तर दुसरीकडे राहीलचा मृतदेह सापडल्याने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tCjleBR
No comments:
Post a Comment