Breaking

Thursday, July 20, 2023

रस्त्याच्या कडेला बाईक, काही अंतरावर मृतदेह... त्या रात्री निखिलसोबत नेमकं काय घडलं? https://ift.tt/sFrtZ4x

नागपूर : खापरखेडा पोलीस ठाण्यांतर्गत जुन्या वादातून तरुणाचा खून झाल्याची घटना बुधवारी मधरात्री उघडकीस आली आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निखिल अशोक पासवान (वय २९) असे मृतकाचे नाव आहे, तो दहेगाव येथील रहिवासी आहे. राहुल राजन सूर्यवंशी (२४, सिल्लेवाड) असे आरोपीचे नाव आहे. एका जुन्या वादा वरून त्यांच्यात आधी भांडण झाले आणि नंतर त्याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, खापरखेडा पोलिसांना गस्तीदरम्यान रस्त्याच्या कडेला एक मोटारसायकल आढळून आली. दूरवर एका तरुणाचा मृतदेह दिसला. तपासाअंती निखिल पासवान असे मृताचे नाव असल्याचे समजले, जुन्या वैमनस्यातून निखिलची हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी निखिलचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.निखिल हा कोराडी परिसरातील एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करायचा. राहुल हा पासवान कुटुंबातील एका मुलीचा प्रियकर असल्याने दोघे एकमेकांना चांगलेच ओळखत होते. कोराडी येथे दोघांनी एकत्र मद्यपान केले आणि दहेगाव (रंगारी) कडे निघाले. किल्ले कोलार परिसरात राहुलने निखिलला दुचाकी थांबवण्यास सांगितली. त्याने दुचाकी थांबवताच राहुलने त्याच्या पोटावर आणि मानेवर वार केले. या प्रकरणातील आरोपींची संख्या अधिक असण्याची शक्यता असून त्या दिशेने पोलिस तपास करत आहेत. या हत्या प्रकरणातील आरोपी राहुलला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. सध्या पोलिसांनी या संदर्भात प्राथमिक माहिती दिली असून पुढील तपास खापरखेडा पोलिस करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QJgZ7y2

No comments:

Post a Comment