Breaking

Sunday, July 23, 2023

१५० वर्षे जुन्या वटवृक्षाच्या आत ४५ वर्षांपासून सुरू आहे चहाचे दुकान, आनंद महिंद्राही थक्क, पाहा व्हिडिओ https://ift.tt/iL3qn7S

नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन हे अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पेजवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करून लोकांना प्रेरित करत असतात. लोक आनंद महिंद्रा यांच्या पोस्टची नेहमीच वाट पाहत असतात. यावेळी त्यांनी एका अनोख्या चहाच्या दुकानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका चहाच्या दुकानाचा आहे. हे दुकान एक वृद्ध व्यक्ती चालवते. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती लोकांना चहा प्यायला देताना दिसत आहे. पण सर्वात खास गोष्ट त्या चहाच्या दुकानात आहे.अमृतसरचे खास चहाचे दुकानअजित सिंग असे या वद्ध चहावाल्याचे नाव आहे. सिंग हे गेल्या ४५ वर्षांपासून दीडशे वर्षे जुन्या वटवृक्षाच्या जटांमध्ये सुरू असलेले हे चहाचे दुकान चालवत आहेत. अजित सिंह यांचे हे दुकान पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ आहे. अजित सिंह वर्षानुवर्षे हे चहाचे दुकान चालवत आहेत. त्यांच्या कुटुंबात माणसे आहेत, कमावतेही आहेत, पण सेवा करण्यासाठी ते वर्षानुवर्षे हे दुकान चालवत आहेत. कोणी पैसे दिले तर ठीक आहे, नाही दिले तरी ठीक. आनंद महिंद्रा यांनी अजित सिंह यांच्या चहाच्या दुकानाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. दुकानाचे नाव 'चाय सेवा का मंदिर' असे आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट करत लिहिले की, मी यापूर्वीही अनेकदा अमृतसरला गेलो आहे. अमृतसरमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, पण पुढच्या वेळी मी या शहराला भेट देईन तेव्हा सुवर्ण मंदिराबरोबर चहा सेवेच्या या मंदिराला नक्कीच भेट देईन. त्याने लिहिले की आपले हृदय हे कदाचित सर्वात मोठे मंदिर आहे. आनंद महिंद्रा असे अनोखे व्हिडिओ शेअर करत असतात. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/gJqPFzC

No comments:

Post a Comment