Breaking

Monday, July 17, 2023

नवऱ्याचा बायकोच्या चारित्र्यावर संशय, दांडक्याने बेदम मारहाण; नंतर धक्कादायक पाऊल उचललं https://ift.tt/D5AKlyo

ठाणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बेदम मारहाण केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापूर पूर्वेत समोर आली आहे. जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बदलापूर पूर्व भागातील यादव नगर परिसरात हे कुटुंब राहते. गेल्या काही दिवसांपासून पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये वाद होत होते. याच तणावातून काही दिवसांपूर्वी पतीने रेल्वेगाडीखाली आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी रात्री पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी पतीने लाकडी दांडक्याने पत्नीच्या डोक्यात प्रहार केला. यामुळे पत्नी बेशुद्ध पडली. तिचा मृत्यू झाल्याचे वाटल्याने पतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pTqlIGX

No comments:

Post a Comment