Breaking

Monday, July 17, 2023

मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचे पावसात भिजत आंदोलन, आरोग्य मंत्री भेट घेत म्हणाले... https://ift.tt/n3emcJL

: मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन समाजातील तरुण आझाद मैदानात पावसात भिजत आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण कसे मिळेल यासाठी कायदेतज्ज्ञांची टीम, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी आपण चर्चा करू. यापूर्वीचे सगळे मोर्चे मराठा समाजाने अत्यंत शांततेत पार पडले आहेत. त्यातच काही तरुणांनी आंदोलन दरम्यान जीव गमावला आहे. त्यामुळे तरुणांनी आंदोलन करताना आपल्या कुटुंबाचीही काळजी करावी, जीवावर बेतेल अस काही करू नका असे आवाहनही सावंत यांनी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या तरुणांना केले. यावेळी आझाद मैदानावर मराठा समाजाच्या तरुणांनी आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मराठा समाजातील सगळ्यांनी मुंबईत जमावं असे आवाहन मराठा वनवास यात्रेचे समन्वयक योगेश केदार यांनी केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JfFvgE7

No comments:

Post a Comment