पुणे : भिडे पुलाजवळील नदीपात्रातील चौपाटी परिसरात मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेले हॉटेल बंद करण्यास सांगितल्याने हॉटेल चालकाने डेक्कन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांशी वाद घालून अरेरावी केली. हॉटेलचालकाने एका कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. या प्रकरणात हॉटेलचालकावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालकाला अटक करण्यात आली आहे.सचिन हरिभाऊ भगरे (वय ३३, रा. कबीर बाग परिसर, नारायण पेठ) असे अटक करण्यात आलेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल, गाडे, पानाचे ठेले यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. नदीपात्रातील चौपाटी येथील हॉटेल ‘सद्गुरू’ मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू होते. रात्रपाळीत गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. पोलिसांनी हॉटेल बंद करण्यास सांगितले. त्यावेळी हॉटेल चालक भगरेने पोलिसांशी वाद घातला. पोलिसांनी कारवाई करण्यासाठी त्याला डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेव्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याशी भगरे याने हुज्जत घातली. ‘तुला काय करायचे ते कर,’ अशी भाषा भगरेने वापरली. त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भगरे याला अटक करण्यात आली.पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीकोंढवा येथील काका हलवाई दुकानासमोर चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर मदतीला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणात नीलेश अंगद जगताप (वय ३६, रा. महंमदवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप लक्ष्मण चव्हाण (वय ३४, रा. कसबा पेठे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप आणि त्यांचे सहकारी गस्त घालत होते. त्या वेळी कोंढव्यातील ‘काका हलवाई’च्या दुकानासमोर नागरिकांनी गर्दी केली होती. जगताप तेथे गेले असता दुचाकी आणि कारचा अपघात झाल्याचे त्यांना दिसून आले. त्या वेळी जगताप यांनी अपघातग्रस्त दुचाकी उचलली. चव्हाण याने त्यांना विरोध केला. ‘माझ्या गाडीला हात लावणारा तू कोण,’ असे म्हणून शिवीगाळ केली. त्यांच्या वर्दीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rRod2QB
No comments:
Post a Comment