रायपूर: बकरीचा डोळा एखाद्या व्यक्तीचा जीव कसा घेऊ शकतो, हे कसं शक्य आहे, असंच आपल्याला वाटत असेल. पण, सूरजपूर जिल्ह्यातील एका गावकऱ्यासोबत अशीच एक घटना घडली आणि बकरीच्या डोळ्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. बकऱ्याचा बळी दिल्यानंतर या व्यक्तीने त्या बकऱ्याचा डोळा खाल्ला. डोळा त्याच्या घशात अडकला, त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.हे प्रकरण छत्तीसगड येथील सुरजपूरला लागून असलेल्या पर्री गावातील असल्याची माहिती आहे. रामानुजनगर पोलिस स्टेशन हद्दीतील मदनपूर गावात राहणारा ५० वर्षीय बागर साय रविवारी गावातील काही मित्रांसह प्रसिद्ध खोपा धाम येथे पोहोचला होता. त्याने नवस मागितला होता. नवस पूर्ण झाल्यावर बोकडाचा बळी देण्यासाठी तो खोपा धाम येथे पोहोचला होता. बकरीचा डोळा घशात अडकला अन् अनर्थ घडलाखोपा धाम येथे पूजा केल्यानंतर त्यांनी बोकडाचा बळी दिला. त्यानंतर सर्वांनी मिळून मटण शिजवले. त्यानंतर बागर सायने मटणातून बकऱ्याचा डोळा काढला आणि ते मोठ्या चवीने तो खाऊ लागला. पण, तोच बकऱ्याचा डोळा त्याच्या घशात अडकला. बकऱ्याचा डोळा घशात अडकल्याने बागर साय यांना त्रास होऊ लागला. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. ही घटना घडताच उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बागर साय यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांनीही तातडीने रुग्णालयात धाव घेतली. बागर यांच्या निधनामुळे कुटुंबावर एकच शोककळा पसरली आहे. असा अचानक बागर यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर, गावात सध्या या घटनेची खूप चर्चा होत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pSM7qEm
No comments:
Post a Comment