Breaking

Thursday, July 6, 2023

आईच एक गरमतर अन मलग कषणत कटयधश झल कहण वचन थकक वहल... https://ift.tt/iS7ej9I

नॉर्थ कॅरोलिना: तळहाताला खाज सुटणे म्हणजे पैसा येणारच. या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे अनेक लोक तुम्हाला सापडतील. दुसरीकडे, काही लोक अशा गोष्टींवर इतका विश्वास ठेवतात की ते त्यानुसार वागतात. एक महिला देखील अशा अंधश्रद्धांवर खूप विश्वास ठेवत होती आणि सुदैवाने तिची अंधश्रद्धा खरी ठरली. डेली स्टारच्या बातमीनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील आहे. जिथे राहणाऱ्या महिलेला खात्री होती की तिच्या मुलाच्या हाताला खाज सुटली तर तो श्रीमंत होईल. अलीकडे या महिलेच्या विश्वासाचे वास्तवात रूपांतर झाले आणि तिचा मुलगा क्षणार्धात कोट्यधीश झाला. डोनाल्ड पिटमन असे महिलेच्या मुलाचे नाव आहे. पिटमॅन म्हणाले की, माझी आई अनेकदा म्हणायची की हाताला खाज येत असेल तर तो लगेच खिशात घालावा. त्यामुळे पैसे मिळण्याची शक्यता वाढते.पिटमॅन यांनी सांगितले की, एके दिवशी त्यांच्या हाताला खाज येत होती. त्यांनी लगेच एक हात खिशात टाकला आणि दुसऱ्या हाताने Waves Mart & Grill वरून Ruby Red 7s लॉटरीचे तिकीट विकत घेतले. जेव्हा मी ते स्क्रॅच केले तेव्हा मला धक्काच बसला. कारण, पिटमॅनची २ लाख डॉलरची म्हणजेच सुमारे १ कोटी ६५ लाख रुपयांची लॉटरी त्यांना लागली होती.याचे श्रेय पिटमॅनने आपल्या आईला दिले आहे. जेव्हा त्याने त्याच्या आईला याबद्दल सांगितले तेव्हा तिला खूप आनंद झाला. पिटमॅन या रकमेचा काही भाग सेव्हिंग्समध्ये टाकणार आहे, तसेच त्यांना एक डर्ट बाईकही घ्यायची आहे. तर उर्वरित पैसे तो घराचे नूतनीकरण आणि खरेदी इत्यादींवर खर्च करेल.डोनाल्ड पिटमन यांनी सांगितलं की, मी त्या दिवशी कामावर जात होतो. लॉटरीचे तिकीट काढण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. पण, माझ्या हाताला खाज येऊ लागली म्हणून मी खिशात हात घातला. मग लॉटरीचं तिकीट विकत घेतले, ज्याने मला करोडपती बनवले. माझी आई खरं सांगत होती हे सिद्ध झालं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dXK1ycp

No comments:

Post a Comment