जळगाव: जळगाव सुप्रिम कॉलनीतील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आयुष्य संपवल्याची घटना गुरूवारी दुपारी २ वाजता समोर आली आहे. तरुणाच्या जीवन संपवण्यामागचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवन अमरसिंग पवार (वय-३०) रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, पवन पवार हा तरूण जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, गुरूवारी दुपारी २ वाजता घरातील सर्वजण कामाला निघून गेले होते. पवनची आई दुर्गाबाई या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे पवन हा घरात एकटाच होता. त्याने राहत्या घराच्या मधल्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. दरम्यान, त्यांची आई घरात परत आल्यानंतर मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी धाव घेत त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाहपवन पवार यांचा विवाह तीन महिन्यापुर्वीच झालेला होता. त्यांच्या पश्चात घरात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी आणि वहिनी असा परिवार होता. घरात सर्व एकत्र कुटुंब आणि सर्व काही सुरळीत असताना पवन याने अचानक टोकाचा निर्णय का घेतला, हाच प्रश्न सर्वांना सतावत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2OoIEig
No comments:
Post a Comment