Breaking

Wednesday, July 26, 2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खरा ‘बॉस’ कोण? शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस https://ift.tt/n9lzRM2

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर झालेल्या घडामोडींनंतर, खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला बुधवारी नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका-पुतण्यांच्या गटांतील राजकीय संघर्ष आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खरा ‘बॉस’ कोण? यावरून काका-पुतणे आमनेसामने आले आहेत. अजित पवार गटाने पक्षावर सरळसरळ दावा केला आहे. अजित पवार गटाने ३० जून रोजी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे सांगितले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी स्वाक्षरी केलेल्या ठरावाद्वारे पक्षप्रमुखपदी आपली निवड करण्यात आली आहे. प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून कायम राहतील. या प्रकरणाची दखल घेताना निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस पाठवली आहे. पक्षाचा खरा अध्यक्ष असल्याच्या दाव्यावर अजित गटाकडून नोटिशीद्वारे उत्तर मागवण्यात आले आहे. खरी राष्ट्रवादी कोणासोबत राहणार, हे निवडणूक आयोगाला ठरवायचे आहे. शरद गटाच्या उत्तरानंतर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cHpCYq8

No comments:

Post a Comment