मुंबई : गर्दीच्यावेळी ज्येष्ठ नागरिकांना लोकलचा प्रवास अशक्य असतो. एरवीही लोकलप्रवासामध्ये जागेची कसरतच करावी लागते. ज्येष्ठ नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन सध्याच्या मालडब्यातील आसन रचनेमध्ये बदल करत वाढीव आसने देण्याची तयारी रेल्वेने पूर्ण केली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ नागरिकांसंबंधी जनहित याचिकेवर उत्तर देताना लोकलमधील मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन असल्याचे प्रतिज्ञापत्र मध्य रेल्वेने सादर केले असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.लोकलमधून दररोज हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक प्रवास करत आहेत. अत्यंत मर्यादित राखीव आसने आणि त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत लक्षात घेऊन ६६ वर्षीय के. पी. पुरुषोत्तम्म नायर यांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जनहित याचिकेला रेल्वेकडून उत्तर देण्यात आले आहे. लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवता येणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी सध्याच्या आसनरचेनत बदल करण्याची चाचपणी पूर्ण झाली असून प्रत्येक डब्यात सात आसने वाढवता येतील, असे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.लोकलच्या सामान्य डब्यात ज्येष्ठांसाठी राखीव आसने आहेत. मात्र गर्दीच्यावेळी राखीव आसनांवरून तरुणांना जागा रिकामी करण्यास सांगणे म्हणजे वादाचे कारण ठरते. लोकलच्या मालडब्यांची व्यवस्था स्वतंत्र आहे. यामुळे हा उपाय ज्येष्ठांसाठी लाभदायक ठरू शकेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.रेल्वेच्या १२ डब्यांच्या लोकलमध्ये ८८ आसनांसह ४ प्रथम श्रेणीचे डबे असतात. ३९ आसनांचे तीन महिला डबे, दिव्यांग प्रवाशांसाठी ३८ आसनांचे दोन डबे आणि उर्वरित डबे सर्वसामान्यांसाठी राखीव असतात. १२ डब्यांच्या लोकलमधून गर्दीच्या वेळी साडेचार ते पाच हजार प्रवासी प्रवास करतात. यावेळी मालडब्यातील प्रवासी भारमान एक टक्कयांहून कमी आहे. यामुळे मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.न्यायालयामुळेच १४ आसनेसन २०१४ मध्ये, न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्या खंडपीठाने ज्येष्ठांच्या लोकल प्रवासाबाबत जनहित याचिकेवर सुनावणी घेतली होती. जी. ए. बी. ठक्कर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा राखून ठेवण्याची विनंती केली होती. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने जानेवारी २०१५ मध्ये पश्चिम आणि मध्य रेल्वेला प्रत्येक लोकलमध्ये १४ आसने ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याची सूचना केली होती. ज्येष्ठांच्या जागेवर अन्य प्रवासी बसणार नाही, याची दक्षता रेल्वेने घ्यावी, अशी सूचना ही केली होती.९० टक्के सर्वसामान्य प्रवासीलोकलमधील मालडब्याच्या वापराबाबत मध्य रेल्वेने नुकतेच प्रवासी सर्वेक्षण केले. यावेळी ९० टक्के सामान्य प्रवासी आणि दहा टक्के माल वाहतूकदार असल्याचे आढळले, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZQXFGiW
No comments:
Post a Comment