गोपालगंज: लग्नाच्या ४ महिन्यांनंतर डॉक्टरच्या पत्नीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी तिच्या सासरच्यांवर तिच्या खुनाचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर, या नवविवाहितेवर तिच्याच सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले. ही घटना बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील आहे. याथील आलापूर गावात मंगळवारी रात्री एका डॉक्टरच्या पत्नीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर पोहोचलेल्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर मुलीचा गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप केला आहे.हत्येनंतर बुधवारी सकाळी मृत महिलेच्या आई-वडिलांनी तिच्या मृतदेहावर सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले. दारात अंत्यसंस्कार झाल्यानंतर मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. निशा कुमारी असे मृत महिलेचे नाव आहे. निशाचा विवाह २८ फेब्रुवारी रोजी मांझा पोलीस ठाण्यातील आलापूर येथील रहिवासी डॉ. मुकेश कुमार यांच्यासोबत झाला होता.कुटुंबीयांचा आरोप आहे की निशाच्या पतीचे इतर कुठल्या महिलेशी अवैध संबंध होते. त्यामुळे तो तिचा जाच करत होता. यासोबतच हुंड्यासाठीही तो तिला आणि तिच्या कुटुंबाला त्रास देत होता. १८ जुलै रोजी रात्री मारहाण करून गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. घटनेची माहिती मिळताच मांझा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नवविवाहित महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सदर रुग्णालयात पाठवला. रात्री शवविच्छेदन झाल्यानंतर महिलेच्या माहेरच्या लोकांचा संताप अनावर झाला आणि बुधवारी सकाळी अंत्यविधी करण्यासाठी सासरच्या मंडळींच्या दारात पोहोचले. पोलिस येण्यापूर्वीच नातेवाईकांनी महिलेवर अंत्यसंस्कार केले. या घटनेची माहिती मिळताच आलापूर गावातील नागरिक मोठ्या संख्येने जमल्याने तणावपूर्ण परिस्थिती पाहून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. या प्रकरणी मृताच्या पालकांच्या जबाबावरून पोलिसांनी निशाचा पती डॉ. मुकेश कुमार आणि सासू, सासरे यांच्यासह सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यातील एक आरोपी डॉ. मुकेश कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर आरोपी फरार आहेत. लखनऊला हनिमूनला जाणार होतेअटक करण्यापूर्वी पत्नीचे शवविच्छेदन करण्यासाठी सदर हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले डॉ. मुकेश कुमार म्हणाले की, ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी पती-पत्नी दोघेही लखनऊला जाणार होते. दोघांनी छपरा-गोमतीनगर एक्स्प्रेसचे तिकीट काढले होते. त्यांनी तयारीही केली होती, ते निघण्याच्या तयारीत होते, तेवढ्यात वरच्या खोलीत निशा कुमारीच्या आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या पालकांना माहिती देण्यात आली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/udt6YxW
No comments:
Post a Comment