जळगाव: भडगाव शहरात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाहणी दरम्यान यांनी चक्क तिसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवले आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला असून हा विषय जळगाव जिल्ह्यात चर्चेचा बनला आहे. त्यांनी याआधी महामार्गावर जखमी अवस्थेत पडलेल्या दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल करून जीवनदान दिले होते. त्यामुळे चर्चेत आलेले जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची एकदा नव्या विषयावरून पुन्हा जळगाव जिल्ह्यात चर्चा होताना पहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेबाबत जिल्हाधिकारी अमोल मित्तल यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार अमन मित्तल यांनी शुक्रवारी थेट संबंधित जिल्हा परिषद शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या दरम्यान त्यांची या ठिकाणच्या शिक्षकांसोबत मीटिंग सुद्धा झाली. मीटिंग झाल्यानंतर लहान मुलांना पाहून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यातील शिक्षक जागा झाला. त्यांना त्या मुलांना शिकवण्याचा मोह आवरला नाही. या जिल्हा परिषदेच्या शाळेतील तिसरीच्या वर्गात जिल्हाधिकारी गेले. त्यांनी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना चक्क एक धडा शिकवला. चक्क जळगाव जिल्ह्याचे प्रमुख म्हणजेच जिल्हाधिकारी आपल्याला शिकवत असल्याने विद्यार्थ्यांच्याही आनंदाला यावेळी पारा उरला नाही. विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या जिल्हाधिकारी यांचा हा व्हिडिओ समोर आला. यामुळे आता पुन्हा जिल्हाधिकारी अमन मित्तल हे चर्चेत आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rp9cMTW
No comments:
Post a Comment