Breaking

Saturday, July 22, 2023

WI vs IND: कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ निश्चित वेळेपेक्षा लवकर सुरु होणार; काय आहे नेमकं कारण? https://ift.tt/imcM23B

पोर्ट ऑफ स्पेन: पहिल्या कसोटीत अवघ्या ३ दिवसांत शरणागती पत्करणाऱ्या वेस्ट इंडिजने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये लढाऊ वृत्ती दाखवली आहे आणि आक्रमक फलंदाजी करत सामना चौथ्या दिवशी पुढे नेण्यात यश मिळवले. विंडीजच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांचा जोरदार सामना केला, तिस-या दिवशीही पावसाने आणि खेळपट्टीने भारतीय गोलंदाजांना पूर्णपणे वर्चस्व गाजवू दिले नाही. अखेरीस, तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजने ५ गडी गमावून २२९ धावा केल्या आणि फॉलोऑनपासून जवळजवळ स्वतःला सुरक्षित केले.क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर पहिल्या दोन दिवसात गोलंदाजांना कोणतीही मदत मिळाली नाही. तिसऱ्या दिवशी खेळपट्टी बदलेल, अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. काही करिष्माई चेंडू आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरच भारताला विकेट्स मिळवता आल्या. पावसामुळे दिवसभरात दोनदा खेळात अडथळा आला, त्यामुळे दिवसभरात पूर्ण ९० षटकांऐवजी केवळ ६७ षटकेच खेळता आली.मुकेशची पदार्पणातील पहिली विकेट दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात वेस्ट इंडिजने चांगली सुरुवात करत १ गडी गमावून ८६ धावा केल्या. तिसऱ्या दिवशीही त्यांनी चांगली सुरुवात केली. कर्णधार क्रेग ब्रॅथवेट आणि कर्क मॅकेन्झी यांनी भारतीय गोलंदाजांना सहजासहजी विकेट्स मिळू दिल्या नाहीत. यावेळी ब्रॅथवेटने आपले २९वे अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या सत्राच्या तासाभरात वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने मॅकेन्झी (३२) याला यष्टिरक्षकाकडून झेलबाद करून आपली पहिली कसोटी विकेट मिळवली.मॅकेन्झी बाद होताच पाऊस सुरू झाला आणि खेळ थांबवावा लागला. सुमारे पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर दुसरे सत्र सुरू झाले आणि त्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी बचावात्मक फलंदाजी सुरू केली. त्यांनी सहज विकेट्स दिल्या नसल्या तरी त्यांनी मुक्तपणे धावाही केल्या नाहीत. यावेळी ब्रॅथवेटसोबत जर्मेन ब्लॅकवुड होता. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रविचंद्रन अश्विनच्या कमाल ऑफ ब्रेकने ब्रॅथवेटच्या (७५) बचावाला छेद दिला आणि भारताला दिवसातील दुसरे यश मिळाले.तिसऱ्या सत्राची सुरुवात ब्लॅकवूडच्या (२०) विकेटने झाली, जो रवींद्र जडेजाच्या चेंडूवर स्लीपमध्ये अजिंक्य रहाणेने शानदार झेल घेत पॅव्हेलियनमध्ये परतला. अॅलिक अथानाझ आणि जोशुआ दासिल्वा यांनी भागीदारी रचण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये प्रथमच धावांचा वेग थोडा वेगवान झाला. मात्र, तोपर्यंत चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागला होता आणि त्याचा फायदा मोहम्मद सिराजने घेतला, त्याच्या चेंडूवर डासिल्वा (१०) बाद झाला.का लवकर सुरू होणार खेळविकेट पडताच पुन्हा पाऊस सुरू झाला, त्यामुळे पुन्हा अर्धा तास वाया गेला. जेव्हा सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा सुमारे ५० मिनिटांचा खेळ बाकी होता, ज्यामध्ये अथानाझ (नाबाद ३७) आणि जेसन होल्डर (नाबाद ११) यांनी आघाडी राखली आणि भारताला विकेट घेऊ दिली नाही. अखेर खराब प्रकाशमानामुळे पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. फॉलोऑन वाचवण्यापासून विंडीजचा संघ अवघ्या १० धावा दूर आहे.तिसऱ्या दिवसात पावसाने २ वेळा अडथळा आल्याने ९० पेक्षा केवळ ६७ षटके टाकण्यात आली. त्यामुळे तिसऱ्या दिवसाची शतके भरून काढण्यासाठी चौथ्या दिवसाचा खेळ अर्धा तास लवकर सुरु करण्यात येणार आहे. म्हणजेच आज रविवारी भारत वेस्ट इंडिजमधील कसोटी सामना ७:३० ला सुरु होतो तो सामना ७ वाजता सुरु होणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dErScBF

No comments:

Post a Comment