म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक आणि बांधकाम उत्पादनांचे उत्पादक असलेल्या टेक्नोक्राफ्ट ग्रुप बिडकीन (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे ३५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. याठिकाणी एक हजार व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे. कंपनीत सहा महिन्यांत उत्पादन सुरु केली. भूमिपूजन समारंभ सोमवारी झाला.गुंतवणुकीसाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चर (सीएमआयए) च्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. अॅल्युमिनियम आणि स्टील फॉर्मवर्क उद्योगांमधील बाजारपेठेतील टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन २८ ऑगस्ट रोजी झाले. सीएमआयएचे माजी अध्यक्ष नितीन गुप्ता,सचिव उत्सव माच्छर, कोषाध्यक्ष अथर्वेशराज नंदावत, वैभव मालपाणी यांनी संचालक नवनीत सराफ, उपाध्यक्ष दीपक मिश्रा यांची भेट घेतली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेल्या गुंतवणुकीसाठी आभार मानले. टेक्नोक्राफ्ट ग्रुप ही औद्योगिक आणि बांधकाम उत्पादनांची जागतिक उत्पादक कंपनी आहे. ५१ वर्षांहून अधिक कालावधीच्या उत्कृष्टतेचे ट्रॅक रेकॉर्डसह, कंपनी तिच्या उच्च-गुणवत्तेची उत्पादने, नाविन्यपूर्ण उपाय आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यासाठी प्रसिद्ध आहे. टेक्नोक्राफ्ट ग्रुप जागतिक स्तरावर अनेक उत्पादन सुविधा पुरवतो आणि बांधकाम, पायाभूत सुविधा, तेल आणि वायू आणि ऑटोमोटिव्हसह विविध प्रकारच्या उद्योगांना सेवा देतो. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक केंद्रस्थानी असलेल्या ऑरिक , बिडकीनच्या समोर स्थित, टेक्नोक्राफ्ट कंपनी तीन लाख चौरस फुटावर प्लँट उभारणार आहे. हा विस्तार आमची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या आणि आमच्या ग्राहकांना कार्यक्षमतेने सेवा देण्याची आमची क्षमता वाढवण्याच्या आमच्या धोरणात्मक उद्दिष्टांशी संरेखित करतो, असे सराफ यांनी सांगितले. कंपनीचे फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि मार्च २०२४ पासून व्यावसायिक उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी सीएमआयएचे माजी अध्यक्ष राजेंद्र दर्डा, नरेंद्र गुप्ता, रवी माच्छर, नंदकिशोर कागलीवाल आदींसह उद्योजक, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. आगामी काळात या विभागात अशा मोठ्या गुंतवणूक येण्यासाठी चेंबरच्या माध्यमातून काम करण्यात येईल, असे सीएमआयएअध्यक्ष दुष्यंत पाटील यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1WdY8GS
No comments:
Post a Comment