वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर-२’ हा चित्रपट नव्या संसद भवनात दाखविण्यात येत आहे. या निर्णयावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांवर टीका केली आहे. पंतप्रधानांनी भारतीय लोकशाही चित्रपटातगृहात बंदिस्त करून टाकली आहे, असे पक्षाने म्हटले आहे.‘गदर-२’चा नायक असणारे सनी देओल भाजपचे खासदार आहेत. लोकसभेच्या सदस्यांसाठी निर्मात्यांनी या चित्रपटाचे खास शो शुक्रवारी सकाळी ११पासून सुरू झाले. सलग पाच दिवस रोज याच वेळेला हा चित्रपट दाखवला जाणार आहे. संसदेत एखाद्या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाने नुकताच ४०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.काँग्रेसकडून टीका‘गदर-२’चे खेळ संसदेत आयोजित करण्यावरून काँग्रेसने थेट पंतप्रधानांवरच शाब्दिक हल्लाबोल केला आहे. ‘‘नव्या भारता’त राजकारणाचा देखावा केल्यानंतर आता स्वयंघोषित विश्वगुरू भारतीय लोकशाहीला चित्रपटगृहात बंदिस्त करू पाहत आहेत, तेही संसदेत,’ अशी पोस्ट काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर केली आहे. ‘या चित्रपटामध्ये भाजपचे खासदार प्रमुख भूमिकेत असून, त्यांना बँक ऑफ बडोदाचे ५६ कोटी रुपयांचे देणे फेडण्यात अपयश आले आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Btmdjnx
No comments:
Post a Comment