शिल्पा नरवडे, : आदई धबधब्याच्या डोंगरावरून पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल तालुक्यातील आदई धबधब्याच्या डोंगरावर पाठीमागच्या बाजूने बुधवारी रात्रीच्या वेळी चढत असलेल्या दोन व्यक्तींचा पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील एका व्यक्तीचे नाव प्रदीप कामी वय ७ वर्ष तर पारस बाकी वय ३५ वर्ष अशी दोघांची नावे आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेले दोघे सुकपूर येथे राहत होते. पनवेल शहरातील सुकापूर मधील मामा भाच्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या वेळी घडली आहे. पोलिसांनी वर्षासहलींवर आणि धबधब्यांवर जाण्यास मनाई केली असताना सुद्धा सूकापूर गावात राहणारे बाकी आणि कामी कुटूंबीय वर्षासहलीसाठी बुधवारी दुपारी धबधब्यावर गेले होते. यामध्ये सुरुवातीला धबधब्याच्या उंच कड्यावर प्रदीप गेला, मात्र तो अडकल्याचे समजल्यावर त्याचा मामा पारस हा त्याला वाचवण्यासाठी गेला. परंतू ,पाय निसटून दोघेही खाली कोसळले.पोलीस, ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्यांना जखमी अवस्थेत रात्री उशीरा कसेबसे बाहेर काढल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत लांडगे यांनी दिली. वैद्यकीय उपचारांपूर्वीच या घटनेतील मामा भाच्यांचा मृत्यू झाला होता. खांदेश्वर पोलीसांनी वर्षासहलीसाठी धबधब्यांवर जाण्यास मनाई असल्याचे फलक लावले आहेत. तेथे पोलीस बंदोबस्तही आहे. मात्र पोलिसांची नजर चुकवून अनेक नागरिक तेथे वर्षासहलीसाठी जात आहेत. त्यामुळे वन विभागाला येथे वनरक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे. तसेच नागरिकांनी देखील स्वतःच्या जीवाच्या काळजी घेणे जरूरीचे असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.
पर्यटन स्थळांवर संयम गरजेचा
पर्यटन स्थळांवर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गर्दी वाढत असते. या दिवसांमध्ये अनेकदा पर्यटक पर्यटन स्थळी पोहोचल्यानंतर धोका पत्करतात. यामुळं अनेकदा जीवितहानी झाल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत. त्यामुळं पर्यटकांनी पर्यटनस्थळी गेल्यानंतर अनुचित घटना टाळण्यासाठी संयम बाळगणं आवश्यक आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/COGfazu
No comments:
Post a Comment