मुंबई : यंदाही रेल्वेवरील १३ धोकादायक पुलांवरील विसर्जन मिरवणुकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. लालबागमधील महत्त्वाच्या चिंचपोकळी पुलासह मध्य रेल्वेवरील चार आणि पश्चिम रेल्वेवरील नऊ धोकादायक पुलांवर विसर्जनादरम्यान खबरदारी घेण्यात येणार आहे. गणेशमूर्ती पुलांवरून नेताना १०० पेक्षा अधिक कार्यकर्ते ठेवण्यास मनाई करण्यात आली असून, इतरही काही सूचना मंडळांच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.मुंबईमध्ये अनेक जुने आणि धोकादायक पूल असून, यातील १३ पूल विसर्जन मिरवणुकांच्या मार्गात येतात. या पुलांवर गर्दी झाल्यास दुर्घटना होण्याची भीती असल्याने पोलिसांनी सावधगिरी बाळगली आहे. विसर्जन मिरवणूकदरम्यान कोणती काळजी घ्यावी याबाबतच्या सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. जुन्या, तशाच धोकादायक पुलांवरून १००पेक्षा अधिक व्यक्ती विसर्जन मिरवणुकी वेळी जाणार नाहीत. विसर्जन मिरवणूक जुन्या, तसेच धोकादायक पुलावर थांबणार नाहीत. पुलावर ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात येऊ नये, तसेच नृत्य देखील करू नये, असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. या पुलांवरून जाताना काळजी घ्यामध्य रेल्वे- घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज- करीरोड रेल्वे ओव्हर ब्रिज- आर्थररोड रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी पूल- भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिजपश्चिम रेल्वे- मरिन लाइन्स रेल्वे ओव्हर ब्रिज- ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मधील पूल- फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)- केनडी पूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)- फॉकलँड पूल (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये)- बेलासीस पूल (मुंबई सेंट्रल स्टेशनच्या जवळ)- महालक्ष्मी स्टील रेल्वे पूल- प्रभादेवी कॅरोल रेल्वे पूल- दादर टिळक रेल्वे पूल
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6i8RN3v
No comments:
Post a Comment